हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात चौकशी अहवाल कार्यालयास सादर करण्याबाबत जिल्हाधिकारी यांना उपआयुक्त महसुल पराग सोमण यांचे निर्देश

34

🔹घंटानाद आंदोलनानंतर उपआयुक्त महसुल यांचे जिल्हाधिकारी बीड यांना निर्देश

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.7जानेवारी):-जिल्ह्य़ातील हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात महसुल प्रशासनातील आधिकारी भुमाफियांची पाठराखण करत असून महसुल व वनविभाग मंत्रालय तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या आदेशाची अवमानना करत बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणात गुन्हे दाखल करण्यास जाणीवपुर्वक टाळाटाळ केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी भु-सुधार विभाग जि.का.बीड, उपविभागीय आधिकारी, तहसिलदार, मंडळ आधिकारी, तलाठी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येऊन त्यांच्या कार्यालयातील इनामी जमिन खरेदी-विक्री प्रकरणात मुल्यांकन करून संबंधित आधिका-यांच्या व नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून बीड जिल्ह्य़ातील इनामी जमिन गैरव्यवहार प्रकरणात Enforcement Directorate मार्फत चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर संबंधित प्रकरणात पत्रात नमुद १ ते १४ मुद्यांच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी करून चौकशी अहवाल कार्यालयास तात्काळ सादर करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

घंटानाद आंदोलनानंतर उपआयुक्त महसुल यांचे जिल्हाधिकारी बीड यांना निर्देश

दि.८ नोव्हेंबर २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी बीड कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येऊन हिंदु देवस्थान इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणात महसुल प्रशासनातील आधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती या आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे, मुक्त’पत्रकार एस.एम युसुफभाई, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, शेख मुबीन संदिप शेळके, भास्कर शेळके, आदि सहभागी झाले होते.