सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे दापोरी येथील नागरिक त्रस्त !

29

🔸रोड मध्ये गेलेली पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन, अप्रोच रोड चे काम करण्यास टाळाटाळ !

🔹सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराच्या दावणीला !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.7जानेवारी):-दापोरी डोंगर यावली सालबर्डी पाळा मोर्शी रस्ता प्रजीमा ६६ कि.मी. ०/०० ते १५/६०० औधोगिक दृष्ट्या महत्वाच्या संत्राप्रकीया उद्योग व तिर्थक्षेत्रास जोडणाऱ्या रस्त्याची सुधारणा करण्या करिता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत १ डीसेंबर २०१६ रोजी शासन निर्णय काढून प्रशासकीय मान्यता दिली मात्र ५ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्णत्वास गेले नसल्या मुळे दापोरी येथील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर रस्त्याचे काम वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनीणे घेतले असून दापोरी सालबर्डी रस्त्याच्या रोडमध्ये दापोरी येथील गावाला पाणी पुरवठा करणारी महत्वाची पाईप लाईन रोडमध्ये गेली असून सदर पाईप लाईनचे काम मंजूर असून सुद्धा हेतू पुरस्परपणे वेल्सपन कंपनी करून देण्यास तयार नसल्या मुळे गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

दापोरी गावातील नागरिकांना तीन दिवसा आळ पाणीपुरवठा होत असल्याने गावातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदर रोडच्या बाजूला नाली अप्रोच रोडचे काम पूर्ण करण्यात आले नसल्यामुळे गावातील नागरिकांना गावामध्ये जाण्यास अडचण निर्माण होत असून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी या गंभीर प्रकाराबाबत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग व कंत्राटदार वेल्सपन कंपनीकला ३१/०७/२०२१ व २५/१०/२०२१ रोजी निवेदन देऊन कळविले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदार यांनी तक्रारीला केराची टोपली दाखविल्यामुळे तक्रारीची दखल कोणीही घेतांना दिसत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदाराच्या दावणीला बांधला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.

दापोरी सालबर्डी रस्ता तीर्थक्षेत्र संत्राप्रकीया उद्योगास जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्याची सुधारणा करण्या करिता हायब्रीड एन्यूटी प्रकल्पा अंतर्गत या रस्त्याचे काम कोट्यावधी रुपये खर्च करून सुरू करण्यात आले मात्र वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे या मार्गाचे काम ५ वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा दापोरी गावाला पाणी पुरवठा करणारी रोडमध्ये गेलेली पाईप लाईन, नाली, अप्रोच रोडचे काम अनेक वेळा पत्र व्यवहार करून सुद्धा पूर्ण करण्यास वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग तयार नसल्यामुळे दापोरी गावामध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वेल्सपन इम्फ्रा प्रा. लि. कंपनी व दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करून ५ दिवसामध्ये कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी दिला आहे.