“जयभीमचा नारा चे प्रेरणास्थान मुस्लिम बांधव” – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना)

29

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

यवतमाळ(दि.7जानेवारी):- आज प्रत्येक आंबेडकरी अनुयायी एकमेकांना भेटल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रती सन्मानाचे प्रतीक म्हणून एकमेकांना आदराने जयभीम घालतो (म्हणतात)
जय: म्हणजे विजय असो
भीम: म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
जयभीम : म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.

जयभिमची पार्श्वभूमी :- विदर्भातील नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे एल.एन.हरदास उर्फ हरदास लक्ष्मण नगराळे यांचा जन्म 6 जानेवारी 1904 मध्ये झाला होता. हरदास हे “महारठ्ठ” नावाच्या साप्ताहिकाचे संपादक होते.

1928 साली हरदास सोबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली होती.

1931 साली झालेल्या दुसऱ्या गोलमेज परिषद मध्ये अस्पृश्यांचा खरा नेता कोण हा प्रश्न जेव्हा उपस्थित झाला होता तेव्हा बाबू हरदास यांनी 12 तारा गोलमेज परिषदेमध्ये पाठवून अस्पृश्यांचा खरा नेता गांधी नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत असे ठणकावून सांगितले होते.1937 साली कामठी – नागपूर मतदारसंघातून ते निवडून आले होते.

एकदा बाबू हरदास यांच्यासमोर मुस्लिम बांधव एकमेकांना भेटल्या नंतर पहिला मुस्लिम बांधवांनी दुसऱ्या मुस्लिम बांधवांना “अस्सलाम आलेकुम” म्हणतात दुसऱ्या मुस्लिम बांधवांनी उत्तर दिले “वालेकुम सलाम” हे ऐकून हरदास यांना वाटलं की आंबेडकरी अनुयायींनी सुद्धा एकमेकांना भेटल्या नंतर एकाने “जयभीम” म्हटले पाहिजेत व तेंव्हा दुसऱ्या ने प्रत्युत्तरादाखल “बलभीम” म्हटले पाहिजे.

1935 पासून जयभिम ची सुरुवात झाली एकाने जयभिम म्हटले की दुसरा बलभीम म्हणायचा पण काळाच्या ओघात जयभीम म्हटल्या नंतर बलभीम म्हणने पाठीमागे पडून जयभीम च्या बदल्यात दुसरा व्यक्ती सुद्धा जयभिम म्हणू लागले तसेच 20 डिसेंबर 1939 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा जयभीम लिहू लागले म्हणू लागले होते.

अशा प्रकारे जगातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायी एकमेकांना भेटल्यानंतर आदरापोटी एकमेकांना जयभीम म्हणून आपला उद्धारकर्ता/प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख करू लागला अशाप्रकारे जयभीम चे जनक बाबू हरदास एल.एन.यांचा मृत्यू 12 जानेवारी 1940 साली म्हणजेच 35 व्या वर्षी झाला आहे.

मा.दादासाहेब शेळके यांनी आज यवतमाळ येथे आमच्या प्रतिनिधीशी जयभीम चे जनक बाबू हरदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा महत्वपुर्ण इतिहास सांगुन माहिती दिली. आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.