जुन्या पिढीतील नव्या विचारांचा नेता स्व. भाऊसाहेब माने – माने सर

35

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि. 8जानेवारी):- तालुक्यातील ज्येष्ठ राजकारणी समाज सुधारक सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी स्व. शंकरराव आजाजी माने उपाख्य भाऊसाहेब माने यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1911 मध्ये चातारी येथे झाला.अतिशय सर्वसामान्य नेतृत्व कोणताही व्यक्ती भाऊसाहेब माने यांची सहज भेट घेऊ शकतहोता.उमरखेड तालुक्यासाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे.त्यांची कारकीर्द किंवा वाटचाल त्याकाळात चातारी एका छोट्या खेड्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन सरपंच पदावर असताना त्यांनी केले.

त्यावेळी स्व. वसंतराव नाईक यांनी कार्यक्रमात उपस्थिती दाखवली. त्याच वेळेस भाऊसाहेब माने यांच्या मधले नेतृत्वाचे गुण त्यांनी पाहिले व राजकारणात भाऊसाहेबांना ओढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वसंतराव नाईक साहेबांनी केले.त्यानंतर प्रथमता जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे पुसद चे संस्थापक सदस्य होते.आपला जिल्हा प्रेसचे अध्यक्ष होते. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती आजिवन सदस्य होते.

1962 ला पंचायत समिती उमरखेड चे प्रथम सभापती 1964 ला वसंत सहकारी साखर कारखाना पोफळी चे दुसरे अध्यक्ष तर उमरखेड विधानसभा आमदार म्हणून त्यांनी 1968 ते 1978 पर्यंत उमरखेड विधानसभा मतदार संघाचा कार्यभार अतिशय यशस्वी ठरला.अशा अनेक पदावर राहून त्यांनी जनतेची जनसेवा केली.

समाजातील उपेक्षित वर्ग आणि समाजहित या दोन गोष्टीला मुख्य मानून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिले त्याचा कुठलाही मोबदला किंवा शाबासकी नको असे प्रांजळ परंतु स्पष्ट मत व्यक्त करणारे भाऊसाहेब आजच्या पिढीला फार कमी प्रमाणात माहीत असतील त्यांचे कार्य व कामाचा आवाका पर्वताच्या उंची समान होता.उमरखेड व परिसराचे भूषण म्हणून त्यांना खऱ्या अर्थाने उल्लेखावे लागेल.आपल्या भागातील शेतकरी शेतमजूर हा कारखानदार झाला पाहिजे.

हा उदात्त हेतूने आपल्या सहकारी कार्यकर्त्याच्या मदतीने मा. ना. वसंतराव नाईक साहेबांच्या आशीर्वादाने वसंत सहकारी साखर कारखान्याची कल्पना मांडली व सर्वांच्या सहकार्यातून शेतकऱ्याकडून शेअर्स गोळा करून व कारखान्याचे महत्व पटवून देऊन वसंत सहकारी साखर कारखाना ही कामधेनु उभी झाली. त्यामध्ये भाऊसाहेब माने यांचा सिंहाचा वाटा होता.उमरखेड विधानसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. अनुसूचित जाती करिता मतदार संघ राखीव असल्यामुळे त्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामचंद्र सिंगनकर होते.त्यांना निवडून आणण्यासाठी भाऊसाहेबांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली व त्यांना निवडून आणले त्यामुळे सहाजिकच भाऊसाहेबांच्या राजकीय क्षेत्रात महत्त्व वाढले.

भाऊसाहेबांचे नातु वारसदार आदरणीय डॉ. विजयराव माने कृषी शास्त्रज्ञ हे भाऊसाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहेत.आज भाऊसाहेबांचा नामोल्लेख करून त्यांनी भाऊसाहेब माने कृषी महाविद्यालय, कुपटी ही संस्था स्थापन करून परिसरातील मुली मुलं या कृषी पदविकेचा फायदा घेत आहेत.त्याचबरोबर ब्राह्मणगाव परिसरामध्ये तेजमल गांधी कृषी कनिष्ठ महाविद्यालय, ब्राह्मणगाव व श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, चातारी या दोन विद्यालयामुळे परिसरातील सर्व गोरगरीब मुलं शिक्षण घेत आहेत.

स्व. भाऊसाहेब माने सत्यशोधक गौरव समिती च्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था लोकांचा सत्कार दरवर्षी केला जातो.त्याचबरोबर भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठान मार्फत शेतकरी मेळावे क्रुषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या दरवर्षी एकवीस लोकांचा गौरव या समितीमार्फत केला जातो.त्याचबरोबर भाऊसाहेब माने आरोग्य प्रतिष्ठान तर्फे मागील दोन महिन्यात ब्राह्मणगाव चातारी याठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.

त्या ठिकाणी दोन हजार लोकांची तपासणी केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे याठिकाणी आरोग्यविषयक हित जोपासले जात आहे.काही दिवसापूर्वी स्वयंरोजगार मेळावा उद्योजगाच्या माध्यमातून बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे माझ्या परिसरातील लोक उद्योगी झाली पाहिजे ही भाऊसाहेब माने यांच्या कल्पनेनुसार ती कल्पना प्रत्यक्षात डॉ. विजयराव माने राबवत आहेत.सर्वसामान्य सोबत त्यांचे वेळोवेळी हितगुज होत राहते असे. हे एक आदर्श व्यक्तिमत्त्व डॉ. विजयराव माने आमच्या परिसरामध्ये झेप घेत आहेत.

आदरणीय स्व. भाऊसाहेब माने यांचा 9 जानेवारी 1993 रोजी देहावसान झाले. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दि. 9 जानेवारी 2022 रोजी त्यांचा पावन स्मृतिदिन चातारी या त्यांच्या मूळ गावी होत आहे.त्यांच्या पावन स्मृतीस माझ्याकडून विनम्र अभिवादन.अशी माहिती डी.एस. माने सर भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड, यांनी दिली.