रेल्वे उड्डाणं पुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न

34

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.10जानेवारी):-येथील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ऊड्डाणपूलाचे आज राज्याचे सार्वजनीक बांधकाम मंत्री मा.अशोकराव चव्हाण यांचे हस्ते ऊद्घाटन संपन्न झाले.

या प्रसंगी यावेळी खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्रानी, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राहुल पाटील, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, माजी खासदार तुकाराम रेंगे, माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, कार्यकारी अभियंता प्रदीप व्हटकर आदींची उपस्थिती होते.