सिरसदेवीत राशन दुकानदारांचा सावळा गोंधळ

30

🔹डिसेंबर महिन्याचे मोफतचे राशन वाटप नाही,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष

🔸आ. लक्ष्मण पवार सिरसदेवीचा राशन धान्याचा माल चालला तरी कोठे; याकडे आपण लक्ष द्यावे

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.10जानेवारी):-डिसेंबर महिन्या अखेरीस प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील धान्य सिरसदेवी येथील दुकानदारांना शासनाकडून मिळूनही राशन दुकानदारांनी लाभार्थ्यांना वाटप केलेला नसल्याने राशन चा घोटाळा दिवसाढवळ्या करण्यात आल्याने लाभ धारकात संताप व्यक्त होत असून दुकानदारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने हा काळाबाजार सुरू असल्याचे नागरिकात बोलले जात आहे.

मोफत धान्य वाटप प्रकरणी अनेक जिल्ह्यात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात प्रसाद उमटलेली असताना जनतेचे मोफतच धान्य काळ्याबाजारात विकणाऱ्या राशन दुकानदारा वर कसलाच फरक न पडल्याचे दिसून येत आहे.

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी गावामध्ये धान्य वितरण व्यवस्थित होत नाही धान्य वाटप पावत्या दिल्या जात नाही राशन दुकान बंद ठेवतात तसेच डिसेंबर महिन्याचे मोफत चे राशन ऑनलाइन दिसत आहे तरीसुद्धा राशन दुकानदार लाभार्थ्यांना राशन दिले नाही व मोफत चे राशन आले नाही येणार आहे अशी उडवाउडवीची भाषा लाभार्थ्यांना करत आहे.

सिरसदेवी गावामध्ये एकूण तीन स्वस्त धान्य दुकाने असून डिसेंबर महिन्याचे पंतप्रधान गरीब योजनेचे धान्य आले मात्र वाटले नाही मोफत चा माल अजून आलाच नाही असे लाभधारकांना सांगत नगतचा माल दिला पण मोफत मालाला रिकाम्या हाताने परत पाठवलेल्या नागरिकात गोंधळात असताना याचा गैरफायदा दुकानदार घेत आहे तर हाच माल वाटप न करता परस्पर काळ्याबाजारात विक्री करण्यात येत असताना मात्र धान्य ग्राहकांना मिळालेली नाही या प्रकारामुळे राजकारणी गप्प का असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.

मशीन मधून निघालेली पावती ग्राहकांना देणे बंधनकारक असताना किती माल मिळाला , भाव काय कोणता माल कधीचा हा सर्व तपशील माहिती नागरिकांना होईल म्हणून बंधनकारक असताना मात्र मागणी करूनही मिळत नाही तर दिले जात नसल्याने व मोफत मिळणारे गरीब जनतेचे धान्य पळवण्याचा व क***** बाजारात विकण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे तर हा सर्व प्रकार होत असताना आमदार साहेब गप्प कसे असाही प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.