अरूण झगडकर संपादीत ‘ काऱ्या मातीतला हिवरा इसरा ‘ या झाडीबोली प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे लोकार्पण

29

🔸झाडीपट्टी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे शिखर- लिपणकार लक्ष्मण खोबरागडे

✒️बल्लारपूर(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बल्लारपूर(दि.11जानेवारी):-‌झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर(ग्रामीण) च्या वतीने झाडीपट्टीतील नामवंत ६८ कवींच्या अस्सल झाडीबोलीमधील कवितांचा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा कर्मविर विद्यालय येनबोडी येथे करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डाॕ.धनराज खानोरकर होते तर उद्घाटक म्हणून अॕड.पारोमिता गोस्वामी सामाजिक विचारवंत , प्रमुख अतिथी म्हणून अरुण झगडकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर, विजय वासाडे सचिव कृषी जीवन विकास प्रतिष्ठान, डॉ. राज मुसने , पत्रकार विजय सिद्धवार , डॉ.प्रभाताई वासाडे , गझलकार दिलीप पाटील, लिपणकार कवी लक्ष्मण खोब्रागडे लाभले होते. कवी प्रशांत भंडारे यांनी प्रास्ताविक केले.

याप्रसंगी संपादक अरुण झगडकर म्हणाले, की काऱ्या मातीतला हिवरा इसरा काव्यसंग्रहामधून झाडीपट्टीतील लोकसंस्कृतीचे दर्शन घडते.तसेच त्यातून बोली भाषेतील शब्द मराठीभाषेला सशक्त करण्यास मोलाचे योगदान ठरणार आहेत. साहित्यिकांनी समाजमन जागृत करण्यासाठी बोलीभाषेत लेखन करावे असे ते म्हणाले. यापुढे याप्रसंगी लक्ष्मण खोब्रागडे म्हणाले या प्रतिनिधी काव्यसंग्रह असलेल्या कविता पाहता सदर काव्यसंग्रह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा शिखर ठरावा अशा प्रकारचे आहे.

या प्रसंगी झालेल्या कविसंमेलनात संजिव बोरकर, उपेंद्र रोहनकर,शितल कर्णेवार,संतोष मेश्राम,नेताजी सोयाम,मंदाकिनी चरडे, प्रदीप मडावी, सुनील पोटे, मनिषा मडावी, वृंदा पगडपल्लीवार, दिलीप पाटील, परमानंद जेंगठे, नंदकिशोर मसराम, जयंती वनकर, सुजीत मांदाडे,किरण लोडे,वंदना हटवार,संगिता बांबोळे,सुधाकर कन्नाके,अनिल आंबटकर, योगिराज उमरे आदींनी बोलीभाषेतील उत्तम रचना सादर केल्यात. शासनाच्या निर्देशानुसार कोरोना नियमांचे पालन करुन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन डाॕ.अर्चना जुनघरे आणि विरेनकुमार खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन दुशांत निमकरा यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्यातील यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले.