अवकाळी वादळी पावसामुळे कोसळले घर

45

🔸आष्टी येथील आपत्ती ग्रस्त कुटूंबाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व ग्रा. प. सदस्य संतोष बारापात्रे यांचा मदतीचा हात

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी तालुका प्रतीनिधी)मो:-9404071883

चामोर्शी(दि.12जानेवारी):-तालुक्यात तीन दिवसांपासून आष्टी परिसरात अवकाळी वादळी पाऊस सुरू आहे.या वादळी पावसामुळे आष्टी येथील गमतीदास जंगलु उराडे यांचे घर पूर्णतः कोसळले असून यात उराडे यांचे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

ही बाब कळताच शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे व ग्रा. प सदस्य, संतोष बारापात्रे, ग्रा.प. सदस्य छोटू दुर्गे यांनी तात्काळ उराडे यांच्या घराची पाहणी केली व गमतीदास उराडे यांना आर्थिक मदत केली.यावेळी उराडे कटुबियांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानले व घराचे पंचनामे लवकर करून शासनाची सुद्धा आर्थिक मदत लवकर मिळवून देण्याची मागणी राकेश बेलसरे यांच्याकडे केली. यावेळी राकेश बेलसरे यांनी उराडे कुटुंबियांना धीर दिला व लवकरात लवकर प्रशासनाला कळवून मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले. यावेळी गमतीदास उराडे, आकाश उराडे,हरी उराडे,शुभम औतकार,रोहन रायपुरे, अमित कुकुडकर, सुमित कुकुडकर, अजय कारेवार,आदी उपस्थित होते