प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी प्रदिप रघुते यांची नियुक्ती

43

🔸तालुका कार्यकारणीचे गठन- तालुक्यातील अपंगांना न्याय देण्याचा केला संकल्प

✒️अमरावती(पुरोगामी न्युज नेटवर्क)

अमरावती(दि.14जानेवारी):-नांदगाव खंडेश्वर येथे ना. बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेची स्थापना करण्यात आली असून तालुका कार्यकारिणीचे सुद्धा गठण करण्यात आले आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथे नुकतीच प्रहार अपंग क्रांती संघटनेची सभा संपन्न झाली त्यामधे सर्वानुमते येणस येथील धडाडीचे पत्रकार प्रदिप रघुते यांची सर्वानुमते तालुकाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शाम राजपूत हे होते.त्यांनी यावेळी नवीन तालुका कार्यकारिणीचे गठनसुधा केले त्यामध्ये उपाध्यक्ष म्हणुन अशोक बणवटे(कोव्हळा जेठेश्वर) यांना नियुक्ती पत्र देवुन त्याची निवड करण्यात आली.

यावेळी जिल्हा अध्यक्ष श्याम राजपूत अपंग बांधवांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,अपंग बांधवांना वेळोवेळी आलेल्या अनेक अडचणीला समोर जावे लांगते त्याकरिता त्यांचे प्रश्न निकाली काढावे तसेच अपंग बांधवांच्या मदतीला तत्पर राहावे यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचीची कार्यकारणी गठीत करण्यात आली आहे असे सांगितले यावेळी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील महिला आघाडीच्या अध्यक्षपदी रेश्मा बबणराव काकडे..तर सचिव म्हणुन सरला रत्नाकर वाघमारे.. यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच हि कार्यकारणी दिव्याग रेश्मा काकडे सातरगाव हिचा वाढदिवस साजरा करुन तिला सर्व अपंग बांधवांनी शुभेच्छा दिल्या आणि कार्यकारणीची निवड करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती विजय बाबर.गजानन फिरके धामणगाव.बेरोजगार संघटनेचे प्रशात झाडे.श्रिकात गिरी. शिवाजी उईके,जिजाबाई वाघ.पुष्पा देवगडे.शालु ठोसर तसेच विजेंद्र बणसोड.आरती पवार.पुजा काळे.जया भोसले.यमुना हाडेकर.प्रतिक पवार..तसेच मोठ्या संख्येने अपंग बांधव उपस्थित होते..
…………………………….

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अपंग बांधवांना येणाऱ्या अडीअडचणी प्रामुख्याने सोडविण्याकरिता आपण सदैव तत्पर असून सदैव अपंग बांधवांच्या उत्पादनाकरिता आपण प्रयत्नरत राहू अपंग बांधवांनी कोणत्याही अडीअडचणी असल्यास मला संपर्क करावा.
प्रदीप रघुते
नवनियुक्त तालुकाध्यक्ष नांदगाव खंडेश्वर
9049587193