रयत क्रांती संघटनेच्या वतीने महावितरण देगलूर कार्यालयासमोर धरणे आंदोलन

79

✒️माधव शिंदे(नांदेड जिल्हा ,प्रतिनिधी)

नांदेड(दि.14जानेवारी):-रयत क्रांती संघटनेचे सर्वेसर्वा आ. सदाभाऊ खोत यांच्या आदेशानुसार व रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देगलूर येथील महावितरण उपविभागीय कार्यकारी अभियंता कार्यालय समोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी दि.१४ जानेवारी रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

यावर्षी शेतकऱ्यांनी खरीप हंगाम हातातून गेल्यानंतर सुद्धा रब्बी हंगामात अतिशय जोमाने पेरणी केली. आपल्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी दिवसा व रात्री जात आहे पण महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे लाईट ही लपंडावाचा सारखा खेळ करत आहे. दिवसा तर वीज राहतच नाही, रात्री लाईट सतत जात- येत असल्यामुळे शेतकरी महावितरणच्या कारभाराला वैतागलेले आहेत.

एकीकडे सक्तीने विज बिल वसुली करण्यात आली, पण दुसरीकडे विजेची सेवा देत असताना महावितरण चे तीन तेरा वाजत आहेत, रयत क्रांती संघटनेच्या वतीने वेळोवेळी निवेदन आहे व फोनवर महावितरणाच्या अधिकार्‍याला माहिती देण्यात आली पण कोणत्याही पत्राला किंवा फोन ची दखल महावितरणचे अधिकारी घेत नसल्याकारणाने संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, युवा जिल्हाध्यक्ष बालाजी ढोसने, मराठवाडा महिला अध्यक्ष संगीता कोल्हे व जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहे अशी माहिती संघटनेचे नेते उत्तम वडजे धामणगावकर यांनी माहिती दिली.