म्हसवड येथे ऊस वाहतूक करणारी ट्रेकटर ट्रॉली पलटी;दुचाकीस्वार थोडक्यात बचावले

32

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.14जानेवारी);-आज सकाळी नऊ वाजता म्हसवड येथील माळशिरस चौकात श्री श्री रविशंकर साखर कारखाना राजेवाडी या कारखान्याला ऊस पोहोचविणार्या ट्रेकटरला अपघात होऊन ट्रॉली पलटी झाली यात ढोकमोडा येथील दोघे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले त्यांना किरकोळ दुखापत झाली यात दुचाकींचे मोठे नुकसान झाले.सदर घटना घडली त्या ठिकाणाहून माहिती मिळाली अपघात झालेला ट्रेकटर हा माळशिरस रस्त्यावरून वेगाने येत असताना माळशिरस चौकात वळण घेत असताना चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॉली पलटी झाली.

यावेळी पंढरपूर रस्त्याने म्हसवड शहराकडे दुचाकीवरून ढोकमोडा गावातील दुचाकीस्वार येत होते यावेळी ट्रॉलीखाली दुचाकी आली त्यावेळी दुचाकीस्वार बाजूला फेकले गेल्याने किरकोळ जखमी झाले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेहण्यात आले.घटनास्थळी नागरिकाच्यात चर्चा होती की कारखान्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रेकटर चालक हे सतत मध्यधुंद अवस्थेत असतात त्यामुळेच अशा प्रकारचे अपघात नेहमीच होत असतात.ऊस वाहतूक ही नियम बाह्य होत असते क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉलीत भरला जात आहे याकडे पोलीस खात्याचे नेहमीच दुर्लक्ष होताना दिसते.

काही महिन्यांपूर्वी पळशी येथील एक तरुण सातारा पंढरपूर रोड वर अशाच ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रेकटरचा बळी गेला होता प्रशासन याचीच वाट पाहतोय काय अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून येताना दिसत होती.अशा बेकायदेशीर ऊस वाहतुकीस पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घालावा अन्यथा लोकांचे नाहक बळी जातील, मध्यपी चालकांवर योग्य ती कारवाई करन्यात यावी.