मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी आढावा बैठक संपन्न !

29

🔸सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन सिंचनाच्या सोई सुविधा उपलब्ध करण्याचे आ. देवेंद्र भुयार यांनी दिले निर्देश

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.14जानेवारी):-वरुड तालुक्यातील अपुर्ण सिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी देवून सिंचनाची सोय उपलब्ध करणे, संत्रा पिकाची लागवड मोठया प्रमाणावर असल्यामुळे प्रकल्पावर बंदिस्त नलिका वितरण प्रणालीची कामे व सिंचन क्षेत्रात मोठया प्रमाणात वाढ करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करून सिंचन निर्मिती करणे तसेच वैनगंगा गोसिखुर्द नळगंगा पूर्णा तापी कन्हान वर्धा नदीजोड प्रकल्पामध्ये मोर्शी वरुड तालुक्याचा समावेश करण्याबाबत संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक संपन्न झाली.

मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मोर्शी वरुड तालुक्यातील लोणी धवलगिरी सिंचन प्रकल्प बंधिस्त वितरण प्रणालीचे बांधकाम करणे, शेकदरी लघु सिंचन प्रकल्प बंधिस्त वितरण प्रणालीचे बांधकाम करणे, पाक सिंचन प्रकल्प जामगाव खडका, बारगाव मौजा मधील शेतकऱ्यांना सिंचन प्रकल्पातून पाणी उचल करण्याकरीता शेतकऱ्यांना पाणी उचल करण्याची परवाणगी देऊन आरक्षण कोटा मंजूर करण्यात यावा. चांदस वाठोडा लघु प्रकल्प बंधिस्त वीतरण प्रणालीचे मंजूर काम तात्काळ सुरु करण्यात यावे तसेच प्रकल्पाच्या भिंतीमधून पाझरणाऱ्या पाण्यामुळे होणारे शेती पिकाच्या नुकसाणीचे अनुदान मंजूर करून वितरीत करण्यात यावे, सिंचन प्रकल्पाच्या पाझरामुळे होत असलेल्या सततच्या नुकसानीमुळे शेतक-यांची भूसंपादीत करण्यात यावी. धनोडी ते चांदस वाठोडा प्रकल्पाच्या फिडर कालव्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे.

नागढाणा क्र. २, बंदिस्त वितरण प्रणालीमध्ये तांत्रिक चुका असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर अद्यापही पाणी पोहचलेले नाही त्यामुळे बंदिस्त वितरण प्रणालीचे तांत्रिक तृटीची पूर्तता करुन सुरु करण्यात यावी. नागठाणा क्र. २ सिंचन प्रकल्पाकडे जाणाऱ्या ओव्हर फ्लो च्या विरुध्द दिशेने असणाऱ्या शेतकऱ्यांच्या वहीवाटीचा रस्ता पुलासह डांबरीकरण करुन देण्यात यावा. इटामझिरी सिंचन प्रकल्प ते नागठाणा सिंचन प्रकल्पापर्यंत मातीच्या फीडर कालव्याचे कामाचे काँक्रिटिकन करण्यात यावे. झटामझिरी सिंचन प्रकल्पाच्या विरुध्द बाजूला असलेल्या शेतकऱ्यांकरीता रस्ता डांबरीकरण व पुल करण्यात यावा. भेमडी सिंचन प्रकल्पाच्या भितीमधून पाझरणाऱ्या पाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असलेली शेतजमीन संपादीत करण्यात यावी, व नुकसान भरपाई तात्काळ देण्यात येऊन संपादीत करण्यात यावे. भेमडी सिंचन प्रकल्प ते झटामझिरी सिंचन प्रकल्प पर्यंतच्या मातीकाम असणाऱ्या फिडर कालव्याचे क्रॉक्रीटीकरण करण्यात यावे. ५० हेक्टर अतिरीक्त पाणी उचल करण्याची परवाणगी झटामझिरी मौजातील शेतकऱ्यांना देण्यात यावी.

पवणी प्रकल्प ते सुरळी झिरी नदी पर्यंतच्या फिडर कालव्याचे सिमेंत काँक्रीटीकरण करण्यात यावे. अप्पर वर्धा अंतर्गत २०० हेक्टर क्षेत्र सिंचन करण्याकरीता पाणी उचल करण्याची परवाणगी शेतकऱ्यांना देण्यात यावी.अप्पर वर्धा ओव्हरफ्लो लगत असणाऱ्या मोर्शी ते सिंभोरा दरम्यानच्या पुलांची उंची वाढविण्यात यावी. मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या सिंचनाकरीता बंदिस्त वितरण प्रणाली करण्यात यावी. पंढरी मध्यम प्रकल्प (वर्धा डायव्हर्शन) बंदिस्त वितरण प्रणालीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे. पंढरी मध्यम प्रकल्प, चांदस वाठोडा ल.पा. प्रकल्प, लोणी धवलगिरी लघु प्रकल्प, पाक नदी ल. पा. प्रकल्प, निम्न चारघढ लघु पाट बंधारे प्रकल्पाच्या कामांकरिता सुधारित प्रशासकीय मान्यता देणे, भेमडी लघु पाटबंधारे प्रकल्प, झटामझीरी लघु पाटबंधारे प्रकल्प, पवनी लघु पाटबंधारे प्रकल्प, नागठाना लघु पाटबंधारे प्रकल्प, या सर्व सिंचन प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करून मोर्शी वरुड तालुक्यातील सिंचन प्रकल्पांचे तसेच मतदार संघातील इतर प्रलंबित कामे तात्काळ पुर्ण करन्या संदर्भात अपूर्ण सिंचन प्रकल्पांचा आढावा घेऊन अपूर्ण सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विदर्भ विकास पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक संपन्न झाली.

त्यावेळी संबंधित प्रकल्प कार्यालयांनीही वेळोवेळी माहिती देऊन नियोजनपूर्वक कामे पूर्णत्वास न्यावीत, असे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी विदर्भ विकास पाटबंधारे नागपूर विभागाचे कार्यकारी संचालक यांना दिले. मोर्शी वरुड तालुक्याला ड्राय झोन मुक्त करण्यासाठी अपूर्ण असलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन सिंचनाच्या सोई सुविधा उपलब्ध करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले .यावेळी बैठकीला आमदार देवेंद्र भुयार, मोहिते साहेब संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर, पठक साहेब मुख्य अभियंता जलसंपदा विभाग अमरावती, देवगडे मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर, रश्मी देशमुख अधीक्षक अभियंता, सावंत, आडे कार्यकारी अभियंता, चिन्मय फुटाणे, अजय चोरडे, योगेश देशमुख, विवेक फुटाणे, अनुराग देशमुख, सोनटक्के यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.