हदगाव शहरातील टपरी धारकांना शासनातर्फे जागा उपलब्ध करुन देण्यात यावी

27

✒️सिद्धार्थ वाठोरे(हदगाव-नांदेड,प्रतिनिधी)

हदगाव(दि.14जानेवारी):-शहरातील राज्य महामार्ग अंतर्गत रस्ते रुंदीकरण सध्या काम चालू आहे त्यात शहरातील अतिक्रमण व टपरीधारक यांची चांगलीच तारांबळ उडत आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हदगाव शहर सरचिटणीस सलमान खान पठाण यांच्या वतीने दि.१४रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.कोविड 19 चा टाळेबंदीमुळे संपूर्ण जग होरपळे असुन टपरीधारकांना आपला परिवाराचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी अवघड जात आहे. रस्त्याचे काम चालु असल्यामुळे त्यांच्या टपऱ्या हटविण्यात येत आहेत.

त्यांचे हातावर पोट असलेल्यामुळे अवघड होत आहे कुटुंबांचे पालन पोषण त्या टपरीवरच असुन त्यांच्यावर व त्यांच्या कुटूंबीयावर उपासमारिची वेळ येत असुन शासनाने काहीतरी तरतुद अथवा मार्ग काढून त्यांना मानधन व जागा उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी सलमान खान पठाण यांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या वेळी वसंतराव देशमुख तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हदगाव फेरोज खान पठाण जिल्हा संघटक अमिर अली तालुका सचिव सलमान खान पठाण तालुका सरचिटणीस अदी उपस्थित होते