प्रकाश आघाव पाटील यांचे केवळ निलंबन नव्हे तर बडतर्फ करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करा; महसुल मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्तांना तक्रार

27

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.15जानेवारी):-सध्या वाशिम येथे कार्यरत उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्यावर केवळ निलंबन नव्हे तर शासनाची दिशाभूल व फसवणूक करून कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडवल्याबद्दल बडतर्फ करून त्यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करून त्यांच्या कालावधीतील ईनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणातील जमिनीचे मुल्यांकन करून त्यांच्याकडुन नुकसान भरपाई घेण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, प्रधान सचिव, महसुल मंत्री, प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभागीय कार्यालय औरंगाबाद यांना ईमेलद्वारे केली आहे.

बीड जिल्ह्य़ातील तत्कालीन उपजिल्हाधिकारी भु-सुधार कार्यालय जि.का.बीड प्रकाश आघाव पाटील यांनी विविध धार्मिक स्थळांच्या ईनामी जमिनी आधिकार क्षेत्रात नसताना तसेच काही ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलुन खिदमतमास जमिनी बनावट दस्तावेज तयार करून मदतमास दाखवून आर्थिक लाभातुन भुमाफियांशी संगनमताने खाजगी व्यक्तीच्या नावे हस्तांतरित केल्या असुन शासनाचा नजराना न भरताच तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन करून शासनाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर केवळ निलंबनाचीच नव्हे तर बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच त्यांच्या कार्यकाळातील इनाम जमिन गैरव्यवहार प्रकरणातील जमिनींचे मुल्यांकन करून त्यांच्याकडुन आर्थिक नुकसान भरपाई घेऊन शासन तिजोरीत जमा करण्यात यावी तसेच त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात यावी.