अपंगाची कर्ज फाईल गेल्या दोन वर्षांपासून भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळस मंजूर होत नसल्याने

29

🔸अपंगयुवकाने परिवारासह अन्नत्याग उपोषणाचा करण्याचा दिला इशारा

🔹जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जानेवारी 2022 ला बेमुदत अन्नत्याग सत्यागृह करण्याचा इशारा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

परभणी(दि.20जानेवारी):-परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथील भारतीय स्टेस्ट बँक इंडिया यांच्याकडे गेल्या दोन वर्षापासून समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्याकडून अपंगासाठीची बीज भांडवल कर्ज योजनेची किराणा दुकानासाठीची कर्ज फाईल गेल्या दोन वर्षापासून बँक दत्तक नसल्याचे कारण दाखवून भारतीय स्टेट बँक शाखा ताडकळसने नाकारून माझ्यावर अन्याय केला आहे. तेव्हा सदरील बँकेत माझी कर्ज प्रकरणाची फाईल तात्काळ मंजूर करण्यासाठी बँकेस आदेशित करा नसता मी बेमुदत उपोषणास अन्नत्याग करून बसेल असा इशारा महातपुरी येथील अपंग सचिन न्यानेश्वर सोनकांबळे यांनी जिल्हाधिकारी परभणी, जिल्हा निबंधक परभणी यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

या बाबतीत वेळोवेळी बँकेस निवेदन सादर केले परंतु या कडे दुर्लक्ष केले तसेच मा. जिल्हाधिकारी साहेब, परभणी यांना दि.26.08.2021 रोजीचे आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले होते त्यानुसार मा. जिल्हाधिकारी साहेब, परभणी यांनी दि.02.09.2021 रोजी मार्गदर्शक बँकेस दिलेले पत्र. दिले.दि.02.08.2021 रोजी आपल्या मार्गदर्शी बँकेस दिलेले निवेदन , जिल्हा समाजकल्याण अधिकारी जि.प.परभणी यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताडकळस यांना दि. 13.10.2020 रोजी दिलेले शिफारस पत्र पाठवले आहे.

या निवेदनात, अर्जदार सचिन ज्ञानेश्वर सोनकांबळे रा. महातपूरी ता.पुर्णा जि. परभणी यांनी असे नमुद केले आहे की मी पायाने 50% जिल्हा परिषद, पग आहे. अपंगाच्या कोट्यातून समाजकल्याण विभागा मार्फत बीज भांडवल योजने अंतर्गत 1,50,000/ (अक्षरी एक लाख पन्नास हजाराची) कर्ज प्रकरणाची फाईल भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा समाज कल्याण कार्यालय DISTRICE ताडकळस या बँकेत सादर केली. तो प्रस्ताव दोन वर्षापासून बँकेने स्वत:कडे ठेवून ऐनवेळेस गाव दत्तक तसल्याचे कारण सांगून माझ्या कर्ज प्रकरणाची फाईल बँकेने नाकारली आहे. त्यामुळे माझ्यावर व 12/01/12 माझ्या संबंध कुटुंबावर उपासमारीची व आत्महत्या करण्याची वेळ बँकने आणली भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताडकळस जबाबदार आहे. परंतु मला परत बँकेत आलात तर गुन्हा दाखल करण्याची धमकी बँक प्रशासनाने अनेक वेळा दिली आहे. शासनाचे अपंगासाठी पुनर्वसन व मदतीची घोषणा संपूर्ण राज्यात चालू आहे.अपंगाच्या हाताला कामे देऊन त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करण्याचे काम शासन करीत आहे. परंतु ताडकळस बँक प्रशासनाने उलट माझ्यावरच गुन्हा करण्याची धमकी देऊन शासनाच्या पवित्र योजनेला हाडताळ फासली आहे.

तेंव्हा मे. साहेबांना विनंती करण्यात येते की, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ताडकळस या बँकेच्या प्रशासनास तात्काळ माझे कर्ज प्रकरण मंजूरी करण्यासाठी आदेशित करावे. माझ्या कर्ज प्रकरणाची फाईल मंजूर नाही झाल्यास मी संपूर्ण

परिवारासहीत 26 जानेवारी 2022 प्रजासत्ताक दिनी मा. जिल्हाधिकारी साहेब, परभणी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग सत्यागृहास प्रारंभ करणार आहे.
तरी माझ्या तक्रारीची गंभीर नोंद घेवून माझा जीवन मरणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी आपणास या अर्जाद्वारे नम्र विनंती करण्यात येत आहे.