लकी हेअर स्टाईल च्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न

31

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)

धरणगांव(दि.20जानेवारी):– जळगांव येथील तेली समाज कॉम्प्लेक्स मधील लकी हेअर स्टाईल शाखा क्र ०२ व शामा प्रसाद मुखर्जी येथील लकी हेअर स्टाईल शाखा क्र ०१ च्या वर्धापन दिनानिमित्त माधवराव गोळवलकर रक्तपेढी मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी लकी हेअरस्टाईलचे मालक योगेश सावळे, सचिन सावळे तसेच ग्राहक यांच्यासह १५ लोकांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेला योगेश सावळे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व ग्राहकांना मिठाई देण्यात आली.
यावेळी केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी यांनी कृतज्ञता पत्र देऊन गौरव केला.