मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बीड जिल्हा अधिकारी राधाविनोद शर्मा, गेवराई चे तहसीलदार सचिन खाडे यांच्या नाकर्तेपणामुळे 26 जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा

61

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.22जानेवारी):-तालुक्यातील उमापूर भारतीय स्टेट बँक शाखा या मधील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊन देखील कर्ज मिळाले नाही तसेच मयत व आधार पंजीकरण होत नसलेल्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी पासून वंचित ठेवण्याचे काम बँकेने केले आहे यामुळे हजारो शेतकरी कर्जमाफी पासून तर कर्जमाफी होऊन देखील नूतन कर्जापासून वंचित राहिले आहेत यामुळे 26 जानेवारी रोजी गेवराई शेवगाव खळेगाव गायकवाड जळगाव फाट्यात मध्ये अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचे पत्र दिनांक 7/12/2021रोजी जिल्हाधिकारी साहेब यांना यांनी देखील या विषयी आणखीन काही कारवाई केली नाही त्यामुळे रास्ता रोको न करता गेवराई तहसील कार्यालयावर 26 जानेवारी रोजी आत्मदहन करणार आहे.

तसेच खळेगाव ते उमापुर मार्गे जाणाऱ्या अमृता नदीवर पूल करण्यात यावा तसेच खळेगाव ते गायकवाड जळगाव फाटा रस्ता 1972 पासून अर्धवट असून तो तात्काळ खडीकरण डांबरीकरण करण्यात यावा आणि खळेगाव मध्ये श्रद्धास्थान असलेले बेलेश्वर संस्थान नानटी यामध्ये एक ते दोन एकर बेलाचे पत्रा चे झाड असून या ठिकाणी सतत श्रावण मासात महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शन व बेलपत्र देण्यासाठी येत असतात यांना जाण्या-येण्यासाठी रस्ता राहण्यासाठी लाईट व सभामंडप देण्यात यावा तसेच 16मार्च2021रोजी गेवराई तालुक्यात झालेल्या गारपिटीच्या पिक विमा अद्याप दिलेला नाही पिक विमा तात्काळ देण्यात यावा याकरीता 26 जानेवारी रोजी अकरा वाजता गायकवाड जळगाव फाटा येथे रास्ता रोको करण्याचे निवेदन दिनांक6/12/2021रोजी माननीय मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर साहेब यांना दिले होते यांनी देखील या विषयावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही यासह गेवराई तालुक्यातील श्रावणबाळ संजय गांधी निराधार यांना अनेक वर्षापासून खेळत ठेवल्यामुळे 26 जानेवारी रोजी वरील रास्ता रोको न करता थेट तहसील कार्यालयामध्ये आत्मदहन करणार असल्याचे सुनील ठोसर यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर म्हणाले की खळेगाव ते उमापुर रोडवर मोठे अमृता नदीचे पात्र असून पुल नसल्याने भोजगाव,पौळाचीवाडी सारख्या घटना घडल्या वर कामं करणार का? यामुळे अनेक शेतकऱ्यांना समस्या निर्माण होत आहेत हा रस्ता म्हणजे अनेक तीर्थक्षेत्र जोडला जाणारा रस्ता आहे साडेतीन पीठापैकी शनी तसेच धाकटीपंढरी समजले जाणारे नगद नारायण गड परत आशेचे श्रद्धास्थान असलेले भगवान बाबा गड आणि पुढे पश्चिम महाराष्ट्रात पैठण विज्ञानेश्वर आपेगाव, माऊलीचे आपेगाव ,राक्षसभुवन, दत्ताचे ठिकाण पंचाळेश्वर अनेक तीर्थ क्षेत्र जोडला जाणारा हा रस्ता असून या रस्त्यावर पूल नसल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत यासाठी शेतकरी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलन उपोषण केली आहे परंतु त्यांच्या आंदोलन उपोषणाकडे सतत शासनासह प्रशासनाने देखील डोळेझाक करण्याचे काम केले आहे एवढेच काय पण मागील वर्षी या अमृता नदीच्या पात्रा लहान पुला मुळे पौवळच्यावाडी ठिकाणी तीन जणांना जीव गमवावा लागला तर चालू वर्षांमध्ये पूल नसल्यामुळे भाजगांवमध्ये देखील अशीच घटना घडली याला जबाबदार कोण किमान जिल्हा नियोजन समिती आराखड्ड्यातून हे काम पूर्ण होणे गरजेचे होते.

असे देखील कठोर शब्दात बोलत सुनील ठोसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले पुढे बोलताना ते म्हणाले की खळेगाव ते गायकवाड जळगाव फाटा अर्धवट अवस्थेत आहे हा रस्ता असून या ठिकाणी खडीकरण देखील झालेले आहे काही काळ या रस्त्याने बस देखील चालू होती हा विषय देखील प्रशासनाने जाणून-बुजून मार्गी लावला नाही या रस्त्याला देखील अनेक समस्या निर्माण होत आहेत या करता देखील शेतकऱ्यांनी 2013 पासून आंदोलन निवेदन केले परंतु याकडे देखील दुर्लक्ष करण्यात आली तसेच भारतीय स्टेट बँक शाखा उमापूर या शाखेतील हजारो शेतकरी कर्जमाफी होऊन देखील नवीन कर्जासाठी लागणारे कागदपत्र वारंवार देऊन देखील वंचित राहत आहे दोन वर्षापासून शेतकऱ्याचा या मुजोर बँकेने खेळ चालवला असून शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणले आहे तर मग शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागावा यासाठी मी वरील कार्यालयास संघटनेच्या माध्यमातून प्रश्न वाचा फोडण्याचे काम केले परंतु माझ्या पत्र देऊन देखील काही फरक पडला नाही यामुळे शेतकरी वारकरी भूमिहीन अंध अपंग निराधार यांना वारंवार विनवणी करून देखील जर न्याय मिळत नसेल तर जगण्यात काय अर्थ त्यांना न्याय मिळावा यासाठी मी रास्ता रोको न करता वरील सर्व समस्या साठी आत्मदहन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे या मध्येंमाऊली नवले, राम नवले, राजु भाऊ मोरे, गणेश चव्हाण, पांडू रंग कोकरे, माऊली माने, कैलास मस्के, बाळराजे जाधव, तुषार डोंगरे, भारत शिंगणे आदि शेतकऱ्यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभागी असलेले सांगितले आहे