चामोर्शी :-मिरची तोडाई मजुरांची चारचाकी वाहन झाले पलटी

99

🔸सहा गंभीर तर तेरा जखमी

🔹पहाटेच्या सुमारास व्यायाम करणे भोवले असते जिवावर

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनीधी)मो:-९४०४०७१८८३

चामोर्शी( दि.२२जानेवारी):- गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील अनखोडा नाल्याजवळ आज पहाटे ५.०० ते ५.३० च्या दरम्यान चारचाकी वाहन पलटी होऊन सहा गंभीर तर तेरा जखमी झाल्याची घटना घडली.सदर घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले व पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णालयात रुग्णालय आष्टी येथे उपचारासाठी दाखल केले.
सदर वाहन मध्य प्रदेश मधून तेलंगणा केडे जात होते. वाहन क्र.CG9 JJ4800 हे कृझर वाहन मंडला जिल्हा मध्यप्रदेश येथून काल दि २१ जानेवारी ला सा.५.०० वाजता मिरची तोडाई मजुर घेऊन निघाले .रात्रोचा प्रवास करून अनखोडा गावाजवळील नाल्याच्या वळनावर व्यायाम करनारे लोक रोडवर बसून दिसल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्यांनी जागेवर ब्रेक दाबले त्यामुळे वाहण दोन तिन वेळा पलटी झाले.

यावेळी लागलीच आष्टी पोलीसांनी त्यांना गाडीतून काढून रुग्णालयात दाखल केले सहा लोकांची प्रकृती गंभीर असल्याने आष्टी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय पंदिलवार यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली व गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.
गंभिर मध्ये आशा इंद्रेश कोडापे २३ रा उमरीया जिल्हा मंडला (म.प्र) शिवचरण काशिराम नर्ते ३० रा.उमरिया ,जानकी शिवप्रसाद मारकु २३ रा, सहेवरा जिल्हा दिंडोरी,श्राबंती मौली मात्र राम ३४ रा. उमरीया, इंद्रेश कमलसिंग कोडापे २१ रा उमरिया ,छोटू बुत्तूहरीसिंग यादव १८ रा. बनियातारा जिल्हा मंडला हे गंभीर असल्याने त्या हलविण्यात आले.तर जखमी मध्ये इंद्रेशकुमार पप्पूसिंगगिनाबाई बगेल वय ३४ बिनयातारा ,गणपती सानवानी ४५बनीयातारा अर्चना पंधराम २६बनीयातारा चेतराम मसराम ५३रा़,उमरीया, रामबली धुवै, ३० पठाघर, संतोषी यादव, १८,रा,बनीयातारा, रामप्यारे धुवै ३५,पठाघर, रामचरन नत्ती,४५,उमरीया, रोशनी सयाम १४उमरीया,असे असून काहिंचे नाव कळाले नाही.

जखमींना आष्टी पोलीसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करताच डा,कुकुडकर अधिपचारीका राठोड,व चांदेकर यांनी तात्काळ उपचार व मलमपट्टी केली व गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविले
पहाटेच्या सुमारास व्यायाम करनारे लोक रस्त्यावर दोन्हीं बाजुला बसुन ‌असतात आणि सदर रोड अरुंद असल्याने वाहनचालकांची कोंडी होत असते त्यामुळे व्यायामासाठी जाणारे लोकांनी खुल्या मैदानात व्यायाम करावा जेनेकरुन त्यानाही प्राणास मुकावे लागणार नाही व दुसऱ्यांचेही प्राण वाचतील हा खबरदारीचा उपाय आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांचे मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, महिला पोलिस उपनिरीक्षक वैशाली कांबळे हे करीत आहेत