अहिंसा पतसंस्थेची संगणक संचाची मदत मोलाची – प्रा.दासरे सर

33

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.23जानेवारी):-रत्नत्रय शिक्षण संस्था मांडवे याना अहिंसा पतसंस्थेच्या वतीने संगणक संच भेट देण्याचा कार्यक्रम सिध्दनाथ प्रशालेचे प्रा.दासरे सर यांचे हस्ते नुकताच पार पडला.
यावेळेस अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी, रत्नत्रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री आनंतलाल दोशी,सचिव प्रमोद दोशी,प्राचार्य पाटील, संचालक बाहुबली दोशी,अभिजित दोशी, विजय टाकणे,एल.के सरतापे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.दासरे हे होते. निरज व्होरा यांनी प्रास्ताविक केले.यावेळी जेष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की,आज अहिंसा पातसंस्थेला तब्बल 18 वर्षे पूर्ण झाली.कोणतीही संस्था मोठी अशीच होत नसते त्यासाठी अथक परिश्रम व प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. नितिनभाई हे या सर्वांपाठीमागाचे खरे हिरो आहेत . 18 वर्ष सतत ऑडिट अ वर्ग मिळवणे सोपे नाही त्यासाठी सततचा पाठपुरावा , सर्वाना सोबत घेऊन काम करणे हेच होय.

सतत सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले तसेच या पतसंस्थेची वाढ व विकास करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.रत्नत्रय शिक्षण संस्थेचे आनंतलाल दोशी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, नितिनभाई दोशी नाव आज पर्यंत आम्ही ऐकत आलो होतो परंतु आज त्यांना भेटून कृतार्थ झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. स्वच्छ व निष्कलंक व्यक्तिमत्व पाहून खरेच भावुक झालो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.रत्नत्रय शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रमोद दोशी म्हणाले जे बोलतात ते करून दाखवतात म्हणजे “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले”असे व्यक्तिमत्त्व म्हणजे नितिनभाई दोशी होत पत्रकार दिनादिवशी त्यांनी शब्द दिला होता तो त्यांनी आज संगणक संच देऊन पूर्ण केला असे मला वाटते.

रत्नत्रय शिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री पाटील सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जीवनात मोठी माणसे खूप भेटतात पण दातृत्व मोठी असलेली माणसे खुप कमी असतात. त्या लोकांमध्ये मा.नितिनभाई दोशी यांची गणना केली जाईल असावं ते बोलले, नितिनभाई व आनंतलाल दोशी या समसमान कर्तृत्व असलेल्या व्यक्ती आहेत असं मला वाटते.अध्यक्षीय भाषणात बोलताना दासरे सर म्हणाले की, नवीन शिक्षण प्रणाली आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना संगणकाची खूप गरज असून त्या माध्यमातून विविध प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचे काम करता येते.अहिंसा पतसंस्थेने प्रशालेची गरज ओळखून संगणक संच देण्याचे जे कार्य केले आहे ते फार मोलाचे आहे.

या कार्यक्रम प्रसंगी माण तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी एल.के.सरतापे यांची निवड झालेबद्दल त्यांचाही सत्कार अहिंसा पतसंस्थेच्या वतीने माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी यांनी केला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिनभाई दोशी, रत्नत्रय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आनंतलाल दोशी, चेअरमन प्रमोद दोशी, यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी रत्नत्रय संस्थेचे संचालक बाहुबली दोशी, अभिजित दोशी, प्राचार्य पाटील सर,अहिंसा पतसंस्थेचे व्हा.चेअरमन अजित व्होरा, संचालक बाळासाहेब सरतापे,प्रितम शहा, सोमेश्वर केवटे, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरज व्होरा यांनी केले, तर सूत्रसंचालन नितिन वाडेकर यांनी केले व आभार व्यवस्थापक श्री दिपक मासाळ यांनी मानले.