आमदाराच्या कार्यक्षेत्रात अपयश – नाही राखता आला गड

32

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालुका प्रतिनिधी)

चामोर्शी(दि.२३जानेवारी):-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व धानोरा तालुक्यातील दोन्ही नगर पंचायती मध्ये आमदारानी जिवाचे रान करूनही भाजप ला अपयश आले आहे.आमदार डॉ देवराव होळी या गडचिरोली निर्वाचण क्षेत्रातून दोनदा निवडून आले व हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे परंतू नुकत्यात झालेल्या नगर पंचायत निवडणूकीत भाजपला सपाटून मार खावा लागला आहे.

धानोरा नगर पंचायत मध्ये काँग्रेस ला १३ तर भाजपला ३ जागा मिळाल्या व चामोर्शी नगर पंचायत मध्ये काँग्रेस ८ राष्ट्रवादी काँग्रेस ५ तर भाजपला ३ असे बलाबल आहे याचाच अर्थ असा की आमदाराच्या घरात मतदारांनी आमदारास नाकारले आहे असे निवडणूक निकालानंतर दिसून येते आहे.आमदार साहेब तुम्ही आपल्या क्षेत्रात किती जनतेप्रती संवेदनशील आहात हेच या निकालामुळे दिसून येते आहे.