दोंडाईचा भाजपाच्या दिनदर्शिकेचे आ.जयकुमार रावल यांच्या हस्ते विमोचन

26

✒️विशेष प्रतिनिधी(संजय कोळी)

दोंडाईचा(दि.25जानेवारी):- शहर भाजपाचे अध्यक्ष प्रविण महाजन यांच्या माध्यमातून प्रकाशीत केलेले दिनदर्शिकेचे विमोचन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आ.जयकुमार रावल यांनी सांगितले की भाजपाच्या दिनदर्शिका सर्वसामान्य दोंडाईचा शहरातील सर्व नागरीकांना आपल्या दैनंदिन कामासाठी उपयोगी पडेल तसेच दिनदर्शिका तयार करुन शहरातील नागरिकांना मोफत उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

प्रविण महाजन यांनी सांगितले की दोंडाईचा शहरातील नगरपरिषदेच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत आ.जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाने लोकनेते सरकारसाहेब रावल यांच्या नेतृत्वाखाली व नगराध्यक्ष आईसाहेब नयनकुँवर रावल यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नगरसेवक व अधिकारी यांनी प्रचंड परिश्रम घेऊन शहराच्या विकासात मोलाची भर घालुन शहराचा कायापालट केला त्या सर्व कामांचे संकल्पना, आराखडा व पुर्णत्वास नेणारे फोटो प्रसिद्ध करुन शहरातील नागरीकांना उपलब्ध करुन दिलेत . याप्रसंगी उपस्थित जयआदीतीसिंह बाबाराजे रावल ,माजी उपनगराध्यक्ष रविंद्र उपाध्ये , आरोग्य सभापती कृष्णा नगराळे जितेंद्र गिरासे भरतरी ठाकुर हितेंद्र महाले संजय तावडे नरेंद्र गिरासे नरेंद्र कोळी विजय मराठे अनिकेत आव्हाड भैय्या धनगर रामकृष्ण बडगुजर पप्पु धनगर शुभम राजपुत कालु धनगर इ पदाधिकारी उपस्थित होते.