पाक सिंचन प्रकल्पाच्या बंदिस्त नलिकेद्वारे पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी !

109

🔹आमदार देवेंद्र भुयार यांनी केली बंदिस्त नलिकेच्या कामाची पाहणी !

🔸प्रलंबित सिंचन क्षेत्राची कामे तात्काळ पुर्ण करण्याचे दिले निर्देश !

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.25जानेवारी):- वरुड तालुक्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कामांना पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त पाईप लाईनद्वारे पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकार करून मोर्शी वरुड तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून पाक नदी सिंचन प्रकल्पावरून १३९४ हेक्टर सिंचन केल्या जाणाऱ्या बंदिस्त पाईप लाईन कालव्याच्या कामाला जलद गतीने पूर्ण करून सोबतच २०२३ पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचन आमदार देवेंद्र भुयार यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

पाक नदी लघु पाटबंधारे प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांच्या बांधावर बंदिस्त नलिके द्वारे वितरण प्रणालीच्या कामाकरिता कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतुद करुन दिल्यामुळे उमरखेड, हिवरखेड दापोरी, मायवाडी, डोंगरयावली, मोळवन, बोपलवाडी, घोडदेव बु, घोडदेव खुर्द या परिसरातील १३९४ हेक्टर क्षेत्र सिंचना खाली येणार असुन आतापर्यंत ८७५ हेक्टर सिंचन क्षेत्राचे काम पुर्ण झाले असुन सदर कामाची आमदार देवेंद्र भुयार यांनी शेतकरी व प्रशासकीय अधिकारी यांना सोबत घेऊन पाहणी करून उर्वरित प्रलंबित सिंचन क्षेत्राची कामे तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले असुन दापोरी हिवरखेड येथील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ बैठक आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, मोर्शी वरुड दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या सिंचन प्रकल्पांच्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला.

मात्र मागील १० वर्षाच्या कालावधीत कामे पूर्णपणे ठप्प होती. २०१९ नंतर या सिंचन प्रकल्पांच्या कामांना पुन्हा गती दिली. पाक सिंचन प्रकल्पाच्या बंदीस्त नलिकेचे कामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहचविण्यासाठी १८ कोटी १ लक्ष ७३ हजार रुपयांची तरतुद केली असून. वरुड मोर्शी तालुक्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी निधी कमी पडणार नाही. पाक सिंचन प्रकल्पावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करून २०२३ पर्यंत बंदिस्त नलिकेद्वारे हजारो शेतकऱ्यांना बांधावर पाणी मिळेल यासाठी अत्यंत जलद गतीने काम सुरू असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले .

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संचालक प्रकाश विघे, हिवरखेड येथील सरपंच विजय पाचारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, निखिल फलके, निलेश कडु, बबनराव विघे, सोमेश्वरराव काळे, यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.