डोंगरी जन परिषदेच्या वतीने गंगाखेड तहसील कार्यालय समोर बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.31जानेवारी):- येथे दि 21.02.2022 रोज सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषणाचा इशारा गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागासह संपूर्ण तालुक्यात 2018साली कोरडा दुष्काळ पडल्याने खरीप हंगामातील सर्व पिके करपून गेली होती परंतु गंगाखेड तालुका शासनाने पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर केला नव्हता म्हणून डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांनी तालुका कोरडा दुष्काळात समाविष्ट करण्यात यावा यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते त्या आंदोलनाची दखल घेऊन दुसऱ्या टप्प्यात गंगाखेड तालुका कोरडा दुष्काळात समाविष्ट करण्यात येवून शेतकऱ्यांना हेक्टरी 6800 रुपये अनुदान जाहीर करण्यात आले परंतु गेल्या चार वर्षांपासून सदरील अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळाले नाही 2018 चे 6800 रुपयाचे अनुदान देण्यात यावे.

यासाठी डोंगर भागातील शेतकऱ्यांनी डोंगरी जन परिषदेच्या वतीने अनेक वेळा आंदोलने केली परंतु प्रशासनाने बजटचे कारण सांगून बजेट आल्यावर वाटप करण्यात येईल असे सांगुन वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिल्यामुळे शेतकरयांना सत्याग्रह करण्यासीवाय पर्याय नाही तसेच 2020.21 सालातील खरीप हंगामातील सोयाबीन व तूर पिकाचा पिक विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना अद्याप दिलानसुन 2020.21 चा पिकविमा देण्यात यावा यासाठी डोंगर भागातील शेतकऱ्यांनी डोंगरी जन परिषदेच्या वतीने कृषी आयुक्त कार्यालय पुणे येथे सतत साहा दिवस घंटानाद आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनाची दखल घेऊन कृषी आयुक्ताने डोंगर भागातील माखणी पिंपळदरी मंडळातील शेतकरयांना तात्काळ विमा वाटप करण्यात येणार असल्याचे लेखी स्वरूपात आस्वासन दिले.

परंतु सदर विम्याचे अद्याप वाटप करण्यात आले नाही तसेच 2021.22 च्या खरीप हंगामात जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने माखणी राणीसावरगाव या महसूल मंडळातील सोयाबीन पिकाची पन्नास ते साठ टक्के घट झाल्यामुळे मा जिल्हाधिकारी यांनी पंचवीस टक्याने अग्रिम विमा या मंडळातील शेतकरयांना तात्काळ देण्यात यावा आशे आदेश रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला देण्यात आले परंतु सदर आदेशाची अंमलबजावणी नकरता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना अग्रिमची पंचेविस टक्के रक्कचे वाटप अद्याप करण्यात आले नसल्याने 2018 च्या कोरड्या दुष्काळाचे हेक्टरी 6800 रुपये अनुदान 2020.21 च्या खरीप हंगामातील सोयाबीन तूर पिकाचा पिक विमा 2021.22 च्या खरीप हंगामात जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाच्या पन्नास ते साठ टक्के घट झाल्यामुळे पंचवीस टक्याने अग्रिम विमा तात्काळ देण्यात यावा या मागण्यासाठी डोंगरी जन परिषदेच्या वतीने डोंगर भागातील शेतकऱ्यांचे गंगाखेड तहसील कार्यालय समोर दि21.02.2022 रोज सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषणास केले जाणार असल्याचे निवेदन गंगाखेड तहसीलदारा मार्फत मा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे मा जिल्हाधिकारी परभणी यांना देण्यात आले.

निवेदनावर डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे आश्रोबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर केशव भेंडेकर दशरथ मोटे शिताराम देवकते बाबुराव नागरगोजे दादासाहेब खांडेकर बालासाहेब प्रभाकर सोडगीर विवेक मुंडे सर्जेराव सोन्नर बालासाहेब रंगनाथ सोडगीर बालासाहेब गुट्टे शंकर आण्णा रुपनर जगन्नाथ मुंडे साहेब पंडित विजयकुमार गरड नागनाथ गरड विनायक दहीफळे बापुराव भालेराव भगीरथ फड दत्ता आयनिले भरत सोडगीर विस्वनाथ घारगीळ आदी शेतकरी बांधव उपस्थित होते