श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयातील जेष्ठ शिक्षक धोटे यांना निरोप

28

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1फेब्रुवारी):-साई शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयातील जेष्ठ शिक्षक एस. जी. धोटे हे दिनांक ३१ जानेवारी २०२२ ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने जेष्ठ शिक्षक एस. जी. धोटे यांना निरोप देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून साई शिक्षण संस्था चिमूरचे सचिव गिरीष भोपे, श्री संत भय्यूजी महाराज विद्यालयाचे मुख्याधापक एस. बी. पिसे तसेच साई शिक्षण संस्था चिमूरचे पदाधिकारी व शिक्षक-शिक्षकेतर वृंद प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जेष्ठ शिक्षक एस. जी. धोटे यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या आयुष्यातील काही प्रसंगावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे शिक्षक तिडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार पंधरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनानी करण्यात आली.