मसला येथे शिवजयंती निमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा

39

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.1फेब्रुवारी):- तालुक्यात मसला येथे शिवजयंती निमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन गंगाखेड तालुक्यातील मसला येथे शिवजयंती निमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आज उद्घाटन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विठ्ठलराव रबदडे मामा यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले. तसेच उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य व्यंकटराव तांदळे, बाबुराव पवार (माजी तालुकाध्यक्ष भाजपा), कृष्णाजी सोळंके (तालुका अध्यक्ष भाजपा गंगाखेड), मनोहर महाराज केंद्रे समाजसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशिनाथ शिंदे पाटील तर व्यासपिठावर बबनराव शिंदे, भगवानराव शिंदे (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना), वैजेनाथराव शिंदे, बालासाहेब शिंदे, आप्पासाहेब कदम, शिवाजीराव शिंदे (तालुका चिटणीस भाजपा, गंगाखेड), नामदेवराव शिंदे समाजसेवक आदी उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भागवत शिंदे, ओमाकांत शिंदे,सुभाष शिंदे, गोपाळ शिंदे, यशवंत शिंदे,माधव शिंदे, नामदेव शिंदे,माधव सवंडकर, नीवर्ती मस्के, बालासाहेब शिंदे आदींनी परिश्रम घेतले.यावेळी पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.