सातत्याने आमदार म्हणूनच वाढदिवस साजरा करावा — माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख

59

🔹वरुड येथे आमदार देवेंद्र भुयार यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा !

🔸वाढदिवसा निमित्य २९ अपंगांना सायकल वाटप !

🔹रक्तदात्यांनी केले रक्तदान !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.1फेब्रुवारी):-आमदार देवेंद्र भुयार यांची तरुणांमध्ये लोकप्रियता आहे. त्यांनी मतदारसंघात व राज्यात केलेल्या कामाची नेहमीच चर्चा होत असते. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत वरुड तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये रक्तदान शिबिर, अपंग बांधवांना सायकल वाटप, मुलांना शालेय साहित्याचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रुग्णांना मदत यासह आदी अनेक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. मोर्शी मतदार संघाचे युवा आमदार देवेंद्र भुयार यांनी स्वतः रक्तदान करून वाढदिवस कार्यक्रमाची सुरुवात करून वरुड मोर्शी तालुक्यात वाढदिवस सामाजिक उपक्रमांचा जागर करणारा ठरला.

वरुड येथील शेतकरी भवन येथे आमदार देवेंद्र भुयार यांच्या वाढदिवासा निमित्य शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून, २९ अपंगांना सायकली वाटप, बांधकाम कामगारांना २५० पेट्या वाटप, माजी सैनिकांचा सत्कार, विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विविध समाजपयोगी उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांच्या आली निर्मलाताई भुयार, बहीण सरिताताई आमदरे, कुटुंबीयांनी औक्षण करत आमदार भुयार यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आमदार देवेंद्र भुयार मतदार संघाचे भल्यासाठी काम करणारा आमदार असल्याचे प्रतिपादन केले आणि आमदार देवेंद्र भुयार यांनी सातत्याने आमदार म्हणूनच वाढदिवस साजरा करावा अश्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार देवेंद्र भुयार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशपंत वडस्कर, प्रशांत डीक्कर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहळे पाटील, माजी सभापती निलेश मगर्दे, जिल्हा उपाध्यक्ष समीर अली, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, माजी पंचयात समिती सभापती कमलाकर पावडे, राजाभाऊ कुकडे, जी प सदस्य सुशीला कुकडे, संदीप खडसे, ऋषीकेश राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस मोर्शी तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष हर्षल गलबले, जितेन शाह, विष्णूपंत निकम, सुभाष शेळके ,श्रीराम यावले, महेंद्र देशमुख, आकाश बेलसरे, रमेशपंत श्रीराव, प्रभाकर काळे, जगदीश काळे, निखिल बनसोड, तारेश देशमुख, अमित गांधी, स्वप्नील आजनकर, संजय चक्रपाणी, जसबीर सिंग, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

आमदार देवेंद्र भुयार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
देण्यासाठी शेतकरी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी यांचे सह तरूणाईची रीघ लागली होती.’देवेंद्रभाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांच्या निनादात जिल्ह्याच्या व मतदार संघाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकत्यांनी आणि आबालवृद्धांनी आमदार देवेंद्र भुयार यांचे अभीष्टचिंतन केले आणि पुढील राजकीय कारकिदींसाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले.