नवरा हवा!.सासु- सासरे नको?

143

घोर कलियुग आला, मुलगा बापाला संपत्तीत वाटा मागतो.नाही दिला तर कोर्टात खेचतो. लोकशाहीर दादा कोंडके यांची आठवण येते.त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यातील गाणे समाजाचे प्रबोधन करणारे.जन जागृती करून संदेश देणारे होते. मातृसत्ताक व्यवस्था संपली आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आली.त्यामुळे एकत्र कुटुंब व्यवस्था संपली,आणि विभक्त कुटुंब व्यवस्था आली.पूर्वी पाचभाऊ लग्न झाल्यावर भी नातवाचे लग्न होई पर्यंत एकत्र राहत होती.पण कधीच भावा भावांचे किंवा जाऊ जाऊचे, देराणी,जेठाणीचे कधी भांडण होत नव्हती. बोलचाल झाली तरी दोनतासानी सर्व विसरून सर्व कुटुंबातील लोक एकत्र येत असत अबोला कधी कोणीच धरत नसत.पुरुषांचा महिलांवर आणि महिलांचा पुरुषावर शंभर टक्के विश्वास होता.आर्थिक व्यवहारात महिला कधीच बोलत नसत.त्यामुळे महिला मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व बद्दल सारखे प्रेम, आदर आणि जिव्हाळा होता.आताच्या मुली सुशिक्षित झाल्या पण कुटुंबातील नवरा सोडून कोणा बद्दल प्रेम, आदर जिव्हाळा राहिला नाही,त्याला जबाबदार आजच्या दूरदर्शन वाहिन्या वरील उच्चभु वर्गातील घरातील घडणाऱ्या घटना म्हणजे आजच्या सिरीयल आहेत,त्यांचा परिणाम मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात होत आहे असे म्हटल्यास चुक ठरणार नाही.

मागासवर्गीय समाजातील लोक खेडये सोडुन शहरात आले चांगली नोकरी मिळाली त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली.शिक्षण आणि विज्ञान यांच्यामुळे सर्वाचाच विकास होत असतांना काही लोक अजूनही देवा देविकाच्या उपास,तापास, नवस याला महत्व देतात.एकच वेळी विज्ञानाचा भरपूर वापर करून फायदा घायचा आणि अज्ञान अंधश्रद्धा याला चिटकून राहायचे त्यामुळे ते खुप पुढे गेले असे म्हणता येत नाही आणि खुप मागे राहिले असे ही म्हणता येत नाही.
गांव असो अथवा शहर बहुसंख्य कुटुंबात मुलामुलीचा संसार सुखात नाही.मुला मुलीच्या लग्न झाल्यावर अनेक तक्रारी वाढत चालल्या मुळे एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली आहे.मुलीला नवरा हवा पण सासु सासरे नको !.हे एकमेव कारण अनेक कुटुंबात ठरत आहे.
मुलगी वयात आली तर मुलीचे योग्य त्यावेळात लग्न न होणे ही गंभीर समस्या निर्माण होते.मुलींच्या योग्य त्या वयात लग्न न करण्याची कारण शोधली तर मुलीचा आणि आई वडिलांचा एकत्र कुटुंब पद्धतीला असलेला विरोध आम्ही कसे सर्व पासुन वेगळे राहतो असेच मुलीने राहिले पाहिजे त्यातूनच मुलांना विचारले जाणारे प्रश्न मुलीच्या डोक्यात बसतात. यातच मग मुलीच्या भावना व तारुण्य जाळत राहते.

मुलाची योग्य तपासणी करून चौकशी करा.मुलाचे शिक्षण किती?. नोकरी कोणती करतो ,कुठे कामावर आहे का.?. किती रुपये पगार आहे का?. रहायला स्वतःचा प्लॉट आहे का?. कार आहे का?. बॅक बॅलन्स किती आहे?. मुलगा एकुलता एक आहे का?. ही माहिती मिळायलाच पाहिजे.पण सरकारी नोकरी पाहिजेच?.गांवी शेती पाहिजेच हे मात्र जास्त होते.मग बीजनेस वाले काय करणार?.कंपनीच्या बॉसची मुलगी नाही देणार?.कारण त्याला नोकरी नसते.पण त्यांचं कंपनीत नोकरी करण्यारा सोबती मुलगीच लग्न लावून देणार कारण त्याला नोकरी असते.आई वडिलांच्या या अपेक्षा पूर्ण होत नाही.त्यामुळे मुलीचे लग्न जुळत नाही,दरवर्षी तेच मुलीच वय वाढत जाते.

तुमच्या अपेक्षा पूर्ण होईनात म्हणून मुलींच बावीसव्या वर्षी सुरू केलेलं वर संशोधन आठ दहा वर्षे चालते.अति अपेक्षा ठेवून मुलींच्या आयुष्याचे वाटोळे अनेक पालका कडून होत आहे.आई वडिलांवर विश्वास ठेवला तर लग्न होऊ शकतात. मुलाला सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते. परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करू शकतात.एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात. मुलांचे आई-वडिलही त्यांच्या पाठीशी असतातच. मुला-मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते, याची जाणीव मुलींच्या आई-वडिलांनाही असने आवश्यक आहे. मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई व मुलीच्या पाठीशी राहिले पाहिजे.म्हणुन मुलामुलींची लग्ने योग्य वयातच झाली पाहिजेत.हा भावनांचा,तारुण्याचा विचार प्रत्येक आई वडिलांनी केला पाहिजे.आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणार नाही.

वधु वर सुचक मंडळ चालविणाऱ्या मित्रांनी सांगितले ल्या अनुभवाच्या हया कथा आहेत. एक सेवानिवृत्त झालेल्या मुलीचा बाप बायोडाटा दाखवीत होता त्याच्या मुलीच वय ३४ होते.निवृत्ती आगोदर लग्न का नाही केले.आता तुम्ही सांगा का थांबलाय होता हा बाप?. कसला वर पाहत होता हा बाप.आपल्या सारखी नोकरी वालाच मुलगा पाहिजे,जर तुम्ही अभिषेक बच्चन सारखा वर शोधत असाल तर तुमची मुलगी ऐश्वर्य रॉय हवीचनां?.मुलीचे योग्य वेळेत लग्न नाही झाले तर तिच्या शारीरिक, मानसिक स्वभावात फरक पडतो.ती चिडखोर व बंडखोर बनते मुलगी लग्न झाल्यावर पूर्ण स्त्री बनते.मग अश्या स्रिया एकत्र कुटुंबातील सर्वाना शत्रु समजतात, छोट्या छोट्या कारण वरून वाद विविध, अबोला,भांडण होतात.त्यामुळे एकत्र कुटुंब विभक्त होते.रक्ताची नाते असले लहानाचे मोठे एकत्र झालेले भाऊ एकमेकांना शत्रु समजतात. एका स्त्री मुळेच रामायण आणि महाभारत घडले हा ऐतिहासिक इतिहास आहे.म्हणुन अविचारी,स्वार्थी स्त्रियांना आळ घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर लग्न जुळवतांना ज्या प्रमाणे सर्व नातलगांना एकत्र बसून दोन कुटुंबाचे मन जुळवून सर्वांच्या साक्षीने लग्न लावले जाते. त्याच पद्धतीने नवरा बायकोत किंवा कुटुंबात वाद विवाद झाला असेल तर तेच लग्न जुळवतांना असलेल्या नातलगांनी समोरा समोर बसून चर्चा करून वाद मिटविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे.न झाल्यास काय होते. कोर्ट कचेरीत हे प्रकरणे जातात. त्यातून काहीच निष्पन होत नाही.समाजात कोणाचीच बदनामी होत नाही.होतो तो फक्त मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास म्हणून सर्वानीच यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.

आई वडिलांचा त्याग आणि मुलांचे लग्न हे प्रत्येक घरात होत असे.म्हणुन प्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे.पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या “पत्नीचा” आकस्मिक मृत्यु होतो. बर्‍याच लोकांनी नातलगांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. परंतु “माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन” असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने लग्न करण्याचे टाळले.बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय,संपत्ती,जमीन,जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले. हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या ऑफिस मध्ये, तर कधी मुलाच्या ऑफिस मध्ये असा इकडे तिकडे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले.

यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले. जेवणानंतर मुलगा काही न बोलता ऑफिसला निघून गेला.दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला “बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत” पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले “बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्‍या आईची गरज नाही” यावर मुलगा म्हणाला “बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याच बरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या ऑफिसमध्ये एका सामान्य कामगारा प्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही.”

कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही.ज्या आई वडिलांनी ज्या अपेक्षेने मुलांचे लग्न करून दिले असते.त्याच आई वडिलांना म्हणजेच सासू सासऱ्यांना बाहेरून आलेली मुलगी अशी वागणूक देत असेल तर त्या जन्मदात्या आई वडिलांनी काय केले पाहिजे.ही आजच्या सर्व जातीच्या समाजातील कुटुंबातील गंभीर समस्या झाली आहे.कौटुंबिक न्यायालयात हजोरो केसेस चालू आहेत. वर्षांनी वर्ष तारिख वर तारीख केस चालतात.त्यात मुलामुलीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होते.जे कधी भरून निघत नाही. ही समस्या एका कुटुंबाची नाही तर सर्व समाजाची आहे.धर्माची आहे.राज्याची आणि देशाची आहे. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरेच न्याय देण्याचे प्रामाणिक काम करते काय?.पैसा असेल तर सर्व मिळेल.पैसा नसेल तर काय भोगावे लागते यांची माहिती घेण्यासाठी चारपाच दिवस कोर्टाच्या आवारात थांबा व पहा..

स्री पुरुष समानताच्या गप्पा मारणाऱ्या या राज्यात,देशात महिलांच्या बाजूने भरपूर कायदे आहेत.पण ते महिलांना न्याय देण्यास असमर्थ आहेत.बेचारे पुरुष महिलांच्या मानसिक त्रासामुळे व्यसनाधीन होत आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.मग ती महिला कोणी असू शकते.बायको,आई,बहिण,वाहिनी,सासु नणंद,देवरांनी,जेठानी हे सर्व पात्र आपण नियमित पणे वाहिन्यावर पाहत आहोत.कळी खुलता खुलेना.तू तिथे मी,तुज्यात जीव रंगला, काहे दिया परदेश,अधुरी ही कहाणी,सास भी बहु थी,सिरीयल मागे पडली असली तरी तिची जागा अनेक सिरीयल वेगवेगळ्या नावाने घेत आहेत. त्याची परिणाम कुटुंबा व्यवस्थेवर होत आहे.असे म्हटल्यास लिहल्यास चूक ठरणार नाही.सोशल मिडीयावर पुरुष महिलाच्या दररोजच्या वागण्यावर अनेक पोस्ट फिरत असतात.त्या लक्षवेधी असतात. पुरुष जीवन भर संसार करण्यासाठी त्याग व संघर्ष करीत असतो. समाज काय म्हणेल या भीती पोटी सतत समझोता करीत राहतो.दुःख विसरण्यासाठी तो दररोज नशा करतो म्हणजे दारू पितो.सर्वच दुःखावर दारू हेच प्रभावी औषध आहे असे लोकांना वाटते पण आज पर्यंत कोणाचे दुःख नष्ट झाल्याचे उदाहरण नाही,पण त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन कायमची बिमारी मागे लागल्याचे एक नाही हजारो उदाहरणे आहेत. म्हणुन प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो,तसाच प्रत्येक व्यसनाधीन,अपयशी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो.म्हणुन प्रत्येक पुरुष हा स्त्रीयांचा बाप,पती,नवरा,मुलगा,भाऊ,जावई,सासरा,दीर,मामा,काका कोणी ना कोणी असतोच. म्हणुन एकत्र कुटुंबातील पुरुषांना नेहमी स्त्रीयांनी मानसन्मान दिलाच पाहिजे. तसाच पुरुषांनी स्त्रीयांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे.हा संस्कार घरा घरातुन मुलामुलींवर झाला पाहिजे,तरच मुलगा आणि मुलगी लग्न करतांना म्हणेल मला एकत्र कुटुंबातील नवरा,किंवा बायको पाहिजे.कोणतीच मुलगी असे म्हणणार नाही नवरा हवा!.सासु सासरे नको.मातृसंस्था समाज व्यवस्था आणि पुरुषसंस्था समाज व्यवस्था म्हणजे काय?. यांची अभ्यासपूर्ण माहिती करून घेण्यासाठी होल्गा से गंगा हे राहुल सांकुल्यायन यांचे पुस्तक प्रत्येकांनी वाचलेच पाहिजे.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडुप,मुंबई)मो:-९९२०४०३८५९