आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे!

30

आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे हे पुस्तक कामगार नेते सागर रामभाऊ तायडे यांनी संदर्भासहित पुस्तकाची मांडणी केली आहे. शिक्षणात व नोकरीत आरक्षणाची सवलत घेणारे कोणत्या संघटनेचे युनियनचे सभासद असतात हे या पुस्तकाची खासियत आहे. आजकालच्या लोकांना कुठे ही नोकरी करा पण कोणत्या विचारधारेच्या युनियनचे सभासद आहेत हेच माहिती नसते.भारतीय समाजव्यवस्था नुसार सांगितल्या शिवाय जगता येत नाही. आरक्षण लाभार्थी घरी व नगरात आले की कट्टर फुले,शाहू आंबेडकरी विचारांचे असतात.नोकरीच्या ठिकाणी कंपनीत,कार्यालयात मात्र संधी साधु विचारांच्या विषमतावादी विचारांचे अर्थ दाते असतात.हे कामगार नेते सागर तायडे यांनी पुराव्यासह दाखवून दिले,म्हणूनच “आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे” हे पुस्तक कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला खूप प्रेरणादायी ठरणारे आहे.

या पुस्तकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामगार चळवळी विषयी अभ्यासपूर्ण माहिती आहे. डाँ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “शासनकर्ती जमात बना” यांचा अर्थ सागर तायडे यांनी अत्यन्त सोपी भाषेत सांगितला आहे.सरकारी नोकरीत आरक्षण लाभार्थी कर्मचारी अधिकारी यांची संख्या लक्षवेधी असतांना त्यांच्यावर हे साडे तीन टक्के लोकसंख्या असलेले लोक कसे काय अन्याय अत्याचार करतात? हेच या ”आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे” पुस्तकातून लेखकाने उकल करून सांगितले आहे.कामगार नेते सागर तायडे नेहमीच असंघटित व संघटित कामगारांच्या समस्यावर लिहत असतात.आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे या पुस्तकाला कामगार चळवळीत तीन मान्यवरांचा आशीर्वाद लाभला आहे,प्रस्तावना आदरणीय जे एस पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांची आहे,आणि इंजिनीयर रमेश रंगारी,यांनी समाज परिवर्तनाचे कार्य अधिक गतिमान करण्यासाठी आणि नरेंद्र जारोंडे यांनी जाणीवा वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत,त्या कामगारांना पुस्तक वाचण्यासाठी उत्स्फूर्तपणे प्रेरणा देतात.

म्हणूनच कामगार कर्मचारी अधिकारी यांनी सागर तायडे यांचे आरक्षण लाभार्थीनी शासनकर्ती जमात बनावे हे पुस्तक वाचलेच पाहिजे,पाच लाख आरक्षण लाभार्थींनी लाचारी सोडून स्वाभिमानी बनावे.पदोन्नती लाभार्थींनी बुद्धिकौशल्य दाखवावे.लाभार्ठीसाठी आता रात्र नव्हे तर दिवस ही वैऱ्याचा असेल.क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा.असे महत्वपूर्ण लेख या पुस्तकात आहेत.संघटीत कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी काय केले पाहिजे आणि कसे केले पाहिजे याची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकात आहे.म्हणूनच म्हणतात नां वाचाल तर वाचाल!.

✒️निलेश नांदवडेकर,खापोली(कार्यालयीन सचिव,स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य)मो:-९३२१८४७८३८