टोल नाक्यावर चालकाकडून पैसे हिसकावले

30

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.5फेब्रुवारी):-धानोरा फाट्या जवळ टोल नाक्यावर दिनांक 5 फेब्रुवारीला रात्री 3:30 वाजता फिर्यादी धीरज वीरेंद्र प्रसाद यादव (20) रा. बासघाट बिहार हा चालक ट्रक क्र. एमएच 34 बीजी 3342 टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असतांना अनोळखी चार आरोपीनी तिथे येऊन चाकू दाखवून रॉडने मारहाण केली व 3,000 हजार रुपये हिसकावून नेले तसेच चालक महेंद्र कुमार प्रेम शंकर दुबे हा ट्रक क्रमांक एमएच 40 एके 0815 उभा करून तिथे झोपून असतांना त्यालाही मारहाण करून त्याचा जवळील 4,700 रुपये हिसकावून नेले.

फिर्यादीच्या तक्रारी वरून घुग्घुस पोलिसांनी कलम 394 (34) गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि. बी. आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा. पो. नि. अंबादास टोपले करीत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक, उप विभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, एलसीबीचे पो. नि. बाळासाहेब खाडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून घुग्घुस येथे भेट दिली.