माता रमाईंच्या १२४ व्या जयंती निमित्त माता रमाई अभिवादन सभा व जाहीर व्याख्यान

28

✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी येवला)मो:-९६०४१६२७४०

येवला(दि.5फेब्रुवारी): – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष येवला यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाईंच्या १२४ व्या जयंती निमित्त माता रमाई अभिवादन सभा व जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राजरत्न वाहुळ यांनी दिली आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगांव,येवला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.कोमल तुपसागर यांचे जाहीर व्याख्यान व अभिवादन सभा सामाजिक कार्यकर्ते महेंद्रभाऊ पगारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

येवला नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी संगीताताई नांदूरकर ह्या उडघटक असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार येवला प्रमोदजी हिले साहेब,API,येवला शहर पोलीस स्टेशनचे नितीनजी खडांगळे, पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रचे डॉ.मनोज गवई,मुक्तीभूमी स्मारक बार्टी प्रकल्प अधिकारी पल्लवी पगारे,सुरेश (मामा) खळे,जीवन पानपाटील असणार आहे.सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ वेळ सायंकाळी ५:३० वा. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह,बस स्टॉप जवळ,येवला येथे संपन्न होईल.

अशी माहिती संयोजक विजय घोडेराव,बाळासाहेब अहिरे,विनोद त्रिभुवन, हमजाभाई मनसुरी,विधाता अहिरे,सुरेश सोनवणे,संदीप भालेराव,महेंद्र खळे,अझरभाई शेख,विजय पगारे,आशा आहेर,कांताबाई गरुड,रंजना पाठारे, बाळासाहेब गायकवाड, ज्योती पगारे,बाळासाहेब सोनवणे,बी.डी.खैरनार सर,विकास सिंगाडे,सचिन बोढारे,शुभांगी मढवई,मयूर सोनवणे,प्राजक्ता जाधव,सुमित गरुड,अक्षय गरुड,ललित भांबेर,शरद विमल दिनकर (शेजवळ सर), मिलिंद गुंजाळ,राजरत्न वाहुळ यांनी दिली आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय,राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका व येवला तालुका स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.