साहित्यिक अंगुलिमाल उराडे यांची अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कलावंत पुरस्कारासाठी निवड

30

✒️सावली(पुरोगामी न्युज नेटवर्क)

सावली(दि.5फेब्रुवारी):-श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जळगाव खान्देश ह्या संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामधील सावली तालुक्यातील जांब (बुज) नावाच्या एका खेडेगावातील रहिवासी असलेले युवा लेखक / कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कलावंत पुरस्काराकरिता नुकतीच निवड केली आहे. लेखक / कवी अंगुलिमाल मायाबाई उराडे हे विषारी साप, पक्षी, विंचू यांना जीवदान देणे. हे त्यांचे नित्यनेमाचे काम….. अत्यंत गरिब परिवारात जन्माला येऊन त्यांनी लेख, कविता, चारोळीच्या माध्यमातून समाज जागृती करीत असतात. गरीब लहान सहान गरजू मुलांना बुक, पेन, ब्याग भेट देणे. ते जिथे असतात तिथे मग कोणताही गाव असो वा जिल्हा…. हाक देताच वेळोवेळी मद्दतीला धावुन जाणे.

अन्यायाविरुद्ध वेळीच बंड पुकारने… हे त्यांचे काम. त्यांच्यामध्ये समाजसेवेची धडपड दिसुन येते. ह्याच त्यांच्या कार्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांना आतापर्यंत काव्य गौरव, कवी रत्न, जिवन गौरव, समाज सेवा, साहित्य गौरव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उत्कृष्ट साहित्यिक, युवा भूषण, अहिल्याबाई होळकर जिवन गौरव, द बेस्ट स्टोरी रायटर्स, पत्रभुषण, आंतरराज्य काव्य गौरव (गुजरात राज्य), समाजरत्न, अशा विविध पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. ह्याच कार्याची योग्य ती दखल घेऊन श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जळगाव खान्देश या सामाजिक संस्थेच्या वतीने युवा साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांची यावर्षीच्या *अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय कलावंत* पुरस्कारासाठी निवड केली असल्याचे श्री. गुरुदेव सेवा मंडळ, जळगाव खान्देश संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री. हरीचंद्र माधव बाविस्कर साहेब यांनी निवडपत्राकाद्वारे कळवीले आहे. त्यामुळे जांब (बुज) गावातील नागरिकांच्या व मित्रमंडळींच्या वतीने साहित्यिक अंगुलिमाल मायाबाई उराडे यांचे भरभरून कौतुक केल्या जात आहे.