सुरक्षा राक्षकावर हल्ला

30

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

घुग्घुस(दि.6फेब्रुवारी):-शनिवार 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता घुग्घुस येथील वेकोलीच्या आयआर बंकर जवळ कामावर असलेले सुरक्षा रक्षक उमेश शंकर ढाले (36) रा. वणी यांना सुरज सिंग रा. बँक ऑफ इंडिया जवळ घुग्घुस याने रस्ता बंद का केला म्हणून कॉलर पकडून हाथाबुक्क्याने मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे त्यांच्या शर्टच्या चार बटना तुटल्या.

फिर्यादी उमेश ढाले यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी सुरज सिंग यांच्यावर कलम 353,332, 504,506 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पो. नि. बी. आर. पुसाटे यांच्या मार्गदर्शनात सहा. पो. नि. मेघा गोखरे करीत आहे. वृत्तलिहे पर्यंत आरोपीस अटक करण्यात आली नव्हती.यापूर्वी येथील बंकर जवळ वेकोलीच्या अनेक सुरक्षा रक्षकावर हल्ले करण्यात आले आहे.या बंकर वर कोळसा चोरी करण्यासाठी जवळील मोहल्यातील गुंड प्रवृत्तीचे लोक येतात व त्यांना अडवील्यास सुरक्षा रक्षकावर हल्ले करतात त्यामुळे या बंकर कडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे परंतु चोरी करण्यासाठी जाणारा रस्ता बंद केल्याने चोरांना त्रास होऊ लागला आहे.