क्रिकेट स्पर्धांमधून चांगले खेळाडू निर्माण होतील: जि .प. सदस्य प्रमोद चीमुरकर

31

🔹खरकाडा येथे क्रिकेट स्पर्धेचा समारोप

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रह्मपुरी(दि.5फेब्रुवारी): क्रिकेट सारख्या खेळापासून शरीराचा व्यायाम होतो व आरोग्य सदृढ राहते शिवाय अशा स्पर्धेचे आयोजन होत राहिले तर भविष्यासाठी युवा पिढी प्रेरक होऊन त्यांना भविष्यात चालना मिळेल अशा स्पर्धा योजनांमुळे गावात चांगले खेळाडू निर्माण होतील असे मौलिक विचार जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर यांनी खरकाडा येथील युवा फौंऊडेशन च्या वतीने दिनांक 21 जानेवारी ते 1 फेब्रुवारी पर्यंत आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.

स्पर्धेचे पहिले बक्षीस 31,001 शिंदेशाही क्रिकेट क्लब सुलेझरी(नागभीड) यांना दुसरे बक्षीस21,001 युवा फाउंडेशन खरकाडा .तिसरे बक्षीस 11,001 nsm चांदगाव तर चौवथे बक्षीस5,001 ईगल्स क्रिकेट क्लब कहाली यांनी पटकावले त्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या हस्ते देऊन बक्षीस वितरण करणयात आले.

हाफ स्पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चीमुरकर ब्रह्मपुरी, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्यालय प्रमुख सुधीर पंदीलवार,डॉ.जी.एम. बालपांडे साहेब, सरपंच संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष तथा जुगनाळा ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोपाल ठाकरे, व्याहाड (बु) येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सुरमवार, तालुका काँग्रेस किसान सेलचे नानाजी तुपट, माजी पंचायत समिती सदस्य दिवाकर मातेरे, माजी सरपंच रवींद्र ढोरे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर ढोरे , मुखरुजी पारधी महाजन, पत्रकार विनोद दोनाडकर, सरपंच सत्यवान शहारे, उपसरपंच ताराचंद पारधी, ग्रा. पं. सदस्य प्रफुल ठाकरे, बगमारे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हिरामण मुळे, सदस्य मनोज मैंद , उत्तम बगमारे, माजी ग्रांपं सदस्य तुकाराम ठाकरे,शंकर ढोरे आदी मान्यवर उपस्थित होते.