शासनासोबत लोकसहभाग महत्वाचा- माजी मंत्री खडसे

32

🔸मासिक ग्राम गौरव व जनसंग्राम न्यूजच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे पुण्यात एकनाथ खडसे यांच्या हस्ते उद्घाटन

🔹ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे कृषि व ग्राम विकासाचे धोरण काल,आज व उद्या या परिसंवादाचे आयोजन

✒️पुणे(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

पुणे(दि.6फेब्रुवारी):- गावाचा विकास होतांना भौतिक सामाजिक व अशा मूलभूत अशा सुविधा झाल्या पाहिजेत यासाठी शासनाच्या ग्राम विकासाच्या विविध योजना राबवतांना प्रत्यक्ष अमंलबजावणी होतांना लोकसहभाग आवश्यक असल्याचे मत माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाटोदा आदर्श गाव सरपंच भास्करराव पेरे पाटील उपस्थित होते.

ग्रामगौरव आणि शब्दसारथी संस्थेतर्फे कृषि व ग्राम विकासाचे धोरण काल,आज व उद्या या परिसंवादाचे आयोजन लॉ कॉलेज रस्त्यावरील प्रसाद अपार्टमेंटच्या आवारात करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ,ग्रामगौरवचे विवेक ठाकरे,कु.धनश्री ठाकरे, अमोल मचाले,पराग पोतदार, विशाल घोडेस्वार,सुनिल शेटे, प्रिया गायकवाड,आर्यन आखाडे, वाय.डी. पाटील,शरद चौधरी आदी उपस्थित होते. परिसंवादाच्या सुरुवातीला ग्रामगौरवच्या राज्यस्तरीय कॉर्पोरेट कार्यालायाचे उदघाटन वृषभ व बैलगाडीचे पूजन करून उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

*■ आदर्श गावाचा आदर्श घेण्याची गरज-*
राज्यात लौकिकपात्र काम केलेल्या ग्रामपंचायतींना शासन आदर्श गाव म्हणून पुरस्कृत करते या आदर्श गावांचे अनुकरण व आदर्श घेण्याची गरज आहे.आपल्या गाव स्वउत्पन्नातून आत्मनिर्भर कसे होईल, यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे,असे परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक भास्कर पेरे-पाटील यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले.सुनील सुतार,गौरव ठाकरे,
राजू भडके,शरद चौधरी आदींनी परिश्रम घेतले.