लतादीदीचे देवी सरस्वतीचे रूप

31

✒️भास्कर फरकडे(तालुका प्रतिनीधी,चामोर्शी)मो:-९४०४०७१८८३

लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने सगळ्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शतकानुशतके त्यांच्या गोड आवाजातील गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील अशी आहेत. लतादीदीनी जगभरातील ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आपल्या आवाजाच्या माध्यमातून भारताचे नाव जगात उंचावणाऱ्या लता मंगेशकर यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. लतादीदींना घरातच गाण्याचं बाळकडू मिळालं होतं. त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर हे मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध संगीतकार, शास्त्रीय गायक आणि नाट्य अभिनेते होते, तर आई गुजराती होती. लतादीदींनी लहानपणापासूनच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते.

मात्र वयाच्या १३ व्या वर्षीच त्यांचं पितृछत्र हरपलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीमुळे लतादीदींना लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी पेलावी लागली. यासाठी त्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. मराठी, हिंदी चित्रपटात गाणी गाण्याची संधी मिळावी यासाठी त्या धडपडत होत्या. पहिला सिनेमा मिळायला लागली होती एवढी वर्ष, बिग बांच्या नावाचाही नाही झाला फायदा त्यांना पहिली संधी १९४२ मध्ये किती हसाल’ या मराठी चित्रपटातील गाण्यानं मिळाली. तर पहिली मंगळागौर या चित्रपटात त्यांनी अभिनयही केला होता. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांना मास्टर गुलाम हैदर यांच्या ‘मजबूर’ चित्रपटातील ‘इंग्लिश छोरा चला गया’ या गाण्यात प्रसिद्ध गायक मुकेशसोबत गाण्याची संधी मिळाली; पण हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून त्यांना ओळख मिळाली तो ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आने वाला या गाण्याने, त्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.

एकापेक्षा एक अवीट गोडीची अविस्मरणीय गाणी त्यांच्या नावावर लिहिली गेली. लता मंगेशकर यांना पहिल्या गाण्यासाठी मानधन मिळाल होतं ते होतं फक्त २५ रुपये. लता मंगेशकर या प्रसिद्धी पायाशी लोळण घेणाऱ्याला मंगेशकर यांची जीवनशैली मात्र अत्यंत साधी आहे. देवो सरस्वतीचे रूप असं त्यांना म्हटलं जातं.