लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन आयोजित आर्ट ऑफ लिव्हिंग शिबीरा चे आयोजन

47

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.8फेब्रुवारी):- येथे लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन च्या संयुक्त विद्यमाने आर्ट ऑफ लिव्हिंग शिबिराचे आयोजन दिनांक 08-02-22 ते दिनांक 14-02-2022 श्री संत जनाबाई कॉलेज येथे वेळ सकाळी 06:00ते 9:00 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात शिकवण्यात येणारं सुदर्शनक्रिया, एक लयबद्ध श्वसनतंत्र. या क्रियेच्या माध्यमातून गेल्या ४० वर्षात १५५ पेक्षा जास्त देशात या संस्थेचा प्रसार झाला असून जगातील 50 करोडपेक्षा जास्त लोकांनी या क्रियेचा अनुभव आजपर्यंत घेतला आहे; त्यामुळे त्यांच्यात शारीरिक, मानसिक व भावनिक स्तरावर आमूलाग्र बदल झाला आहे. याचमुळे या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांची वैश्विक शांतिदुत म्हणून जगभरात ओळख झाली आहे.

आपले व्यस्त काम आणि जबाबदारी यामधूनच आपल्याला सेवा, साधना आणि सत्संग या साठी वेळ / मार्ग काढावाच लागेल.सेवा,साधना(योग,प्राणायाम,ध्यान), सत्संग यांना सर्वोच्च प्राधान्य द्या. या साठी आजच नाव नोंदणी करा,प्रवेशासाठी नोंदणी फिस 900/रुपय ठेवण्यात आली आहे, ज्यांनी अगोदर शिबीर केले आहे,अश्यानी विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. नाव नोंदणी साठी संपर्क साठी मोबाईल नंबर वर संपर्क साधा :-9881808042, 9421384564, 9326859494, 8669268619