आजीचा रोजडे लय भारी, युवकांच्या स्टेटस वर गाजली…

59

🔸ब्रम्हपुरी तालुक्यातील आजी- नातवांचा रोमांचक प्रेम..

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.8फेब्रुवारी):- फेब्रुवारी महिना म्हटलं तर पहिला आठवडा हा युवकांचा आनंदाचा व प्रेम व्यक्त करणारा आठवडा म्हणून ओळखला जातो आणि प्रत्येक दिनांक हा एक विशिष्ट दिवस म्हणून ओळखला जातो. फेब्रुवारीच्या 7 तारीख म्हणजे रोजडे आणि या दिवसाला प्रियकर आपल्या प्रियसीला गुलाबाचं फुल देवून साजरा करीत असतात. परंतु या दिवसाला एक वेगळंच बगायला मिळालं.

एका नातवाने आजीला गुलाबाचं फुल देवून त्याचा तीस मिनिटांचा व्हिडीओ स्टेटस बनवून अख्ख युवकांचा लक्ष वेधून घेतला, सात फेब्रुवारीला म्हणजेच रोजडे ला सर्वत्र व विदर्भात युवकांच्या स्टेटस वर आजी – नातवांचा स्टेटस बगायला मिळालं.हे दोन्ही आजी – नातू ब्रम्हपुरी तालुक्यातील अर्हेर-नवरगाव येथील रहिवासी आहेत, आजीचं नाव सरस्वताबाई ठेंगरे व नातवाचा नाव कार्तिक श्रीहरी वैद्य अस आहे.