दिव्यागाना राजकीय आरक्षण देण्यात यावे

28

🔹प्रहार अपंग क्रांती आंदोलन चे अमरावती येथिल जिल्हाधिकारी यांना निवेदन

✒️प्रदिप रघुते(अमरावती प्रतिनिधी)मो:-9049587193

अमरावती(दि.11फेब्रुवारी):-दिव्याग यांना महानगर पालिका .जिल्हा परिषद.नगर परिषद.ग्रामपचायत.मध्ये राजकीय आरक्षण देण्यात यावे.कारण दिव्यागाचा २०१६ दिव्याग अधिनियम कायदा हा पारित झाला आहे.दिव्याग कायद्या मध्ये दिव्यागाना प्रत्येक क्षेत्रामध्ये समान हक्क व समान संधी ही अधिकाऱ्यांची व्याख्या आहे.परंतु आजही बऱ्याच ठिकाणी २०१६च्या दिव्याग अधिनियम कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने दिव्याग व्यक्ती हा समाजाचा वंचित व दुर्लक्षित घटक आहे.

आणि दिव्यागनाना प्रत्येक ठिकाणी वारंवार आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागतो.दिव्याग यांना राजकीय आरक्षण मिळाल्यास दिव्यागांच्या जिवन विकासामध्ये गती येईल.राजकीय क्षेत्रामध्ये जातीचे व इतर सर्व प्रकारचे आरक्षणे आहेत परंतु दिव्यागणाचा अजुनपर्यंत कोणीच विचार केला नाही.म्हणुन दिव्याग हा समान हक्क समान संधी पासुन वंचित आहे.. त्या अनुषंगाने प्रहार अपंग कांन्ती आंदोलन चे जिल्हा व शहर प्रमुख शाम राजपुत.चेदुं खेडकर.वसु महाराज.प्रशांत झाडे.विजय बाबर.गजानन फिरके.ओम गिरी.शालुबाई ठोसर.प्रदिप रघुते.बबनराव काकडे.तसेच मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी अपंग बांधव हजर होते.