धानोरा टोल नाक्यावर वाटमारी करणाऱ्या चार आरोपीला अटक

29

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

धानोरा(दि.11फेब्रुवारी):-फाट्या जवळ टोल नाक्यावर दिनांक 5 फेब्रुवारीला रात्री 3:30 वाजता फिर्यादी धीरज वीरेंद्र प्रसाद यादव (20) रा. बासघाट बिहार हा चालक ट्रक क्र. एमएच 34 बीजी 3342 टोल नाक्यावर ट्रक उभा करून झोपून असतांना अनोळखी चार आरोपीनी तिथे येऊन रॉडने मारहाण केली व 3,000 हजार रुपये हिसकावून नेले तसेच चालक महेंद्र कुमार प्रेम शंकर दुबे हा ट्रक क्रमांक एमएच 40 एके 0815 उभा करून तिथे झोपून असतांना त्यालाही मारहाण करून त्याचा जवळील 4,700 रुपये हिसकावून नेले होते.

याची माहितीनुसार पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली असता ताबडतोब पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, पोलीस विभागीय अधिकारी देशमुख,घुग्गूस पोलीस स्टेशनचे सपोनि अंबादास टोपले,व सहाय्यक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे यांनी घटना स्थळाला भेट दिली याचा तपास एपीआय पुसाटे व डिबी पथक करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे,गडचांदूर ते पारधी बेडा येथून अनुराग रत्नप्पा भोसले (४८), जाक्की गुजय्या भोसले (२३), उमेश रत्नप्पा भोसले (१८ तिन्ही रा. आरंभा ता समुद्रपूर व सिन्नू किसन पवार (४०) रा. पुलगाव जि. वर्धा या चार आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता 13 फरवरी पर्यंत पीसीआर देण्यात आला पुढील तपास पोनि.बी.आर.पुसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अंबादास टोपले करीत आहे.