लक्ष्मण खोब्रागडे यांना मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई साहित्यभूषण पुरस्कार

38

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11फेब्रुवारी):-मराठी साहित्य मंडळाच्या राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या लिपन या काव्यसंग्रहाची निवड झालेली असून येत्या २७ फेब्रुवारी२०२२ मराठी राजभाषा दिनी उस्मानाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कविसंमेलनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे . लक्ष्मण खोब्रागडे जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर येथील साहित्यिक असून त्यांचा लिपनसह मोरगाड हा झाडीबोलीतील काव्यसंग्रह व यश खेचून आणू दारी हा ललीतलेखसंग्रह प्रकाशित आहे . त्यांचे झाडीबोलीवर संशोधनात्मक कार्य सुरू असून अनेक एकांकिका व वैचारिक लेख लिहिलेली आहेत .

मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे उस्मानाबाद शहरामध्ये राज्यस्तरीय काव्यसंमेलन २७ फेब्रुवारी २०२२रोजी सकाळी १० वाजता आयोजित केले आहे. एप्रिल महिन्यामध्ये उदगीर शहरामध्ये होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हे काव्य संमेलन आयोजित केले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार ओमराजे निंबाळकर करणार असून स्वागताध्यक्ष म्हणून आमदार कैलास घाडगे पाटील हे उपस्थित राहणार आहेत, या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ज्येष्ठ साहित्यिक डॉ .जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट हे भूषविणार असून मुख्य अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष नंदूभैया राजे निंबाळकर व दत्ता बंडकर तसेच नगरसेवक सिद्धेश्वर कोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याच कार्यक्रमामध्ये 95 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यकार भारत सासने यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती मराठी साहित्य मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव वर्षा थोरात यांनी दिली आहे .
मराठी साहित्य मंडळाने यावर्षीचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे यांच्या लिपन या काव्यसंग्रहाला जाहीर केलेला असून त्याबद्दल अरुण झगडकर , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , किशोर आनंदवार , डॉ. धनराज खानोरकर ,प्रशांत भंडारे ,प्रा. रत्नमाला भोयर , वृन्दा पगडपल्लीवार , परमानंद जेंगटे , नागेंद्र नेवारे , मंगला गोंगले , रामकृष्ण चनकापुरे , संतोष उईके , अर्जुमन शेख , प्रीती जगझाप , भारती तितरे , संजीव बोरकर , नंदकिशोर मसराम आदी साहित्यिकांनी हार्दिक अभिनंदन केले .