घुग्घुस पोलीस ठाण्यामध्ये बर्‍याच कालावधीनंतर दुचाकी वाहन लिलाव

31

✒️पंकज रामटेके(घुग्घुस प्रतिनिधी)

🔹15 फेब्रुवारी रोजी 10 ते 2 या कालावधीत होणार लिलाव

घुग्घुस(दि.12फेब्रुवारी):- येथील पोलीस ठाण्यात बऱ्याच कालावधीपासुन दुचाकी वाहने जमा आहेत. उपविभागीय दंडाधिकारी, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये कोणीही व्यक्ती सदर वाहनांबाबत त्यांचा हक्क सांगण्यासाठी किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 87 अन्वये सदर वाहनांचा लिलाव पोलिस स्टेशन,घुग्घुस येथे दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी करण्यात येत आहे.  लिलावातील 66 मोटार सायकलची शासकीय किंमत 99 हजार 200 रूपये असून वाहने परिक्षणाची तसेच अमानत रक्कम, नोंदणीची तारिख दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरावे लागेल. सदर वाहनांचा लिलाव  दि. 15 फेब्रुवारी 2022 रोजी  सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या कालावधीत राहील.

या असेल लिलावासाठी अटी व शर्ती :
नमुद केलेल्या (66 मोटार सायकलची) जंगम मालमत्तेची जशी आहे तशी, जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाच्या तपशीलवार अटी व शर्ती वाचण्यात येईल. विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा केल्यावर लिलाव बोली झाल्यानंतर ज्यांच्या नावाने सदर वाहनांचा लिलाव मंजुर होईल त्या खरेदीदारास उर्वरित रकमेचा भरणा त्वरीत लिलावाचे ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत व मुदतीत केला नाही. तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल.
वाहनांचे इंजिन व चेचीस नंबर मिटवून, वाहनाचे तुकडे करून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहेत (ज्यांच्या नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेच विक्री रक्कमेच्या 10 टक्के अमानत रक्कमेचा भरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावात प्रवेश देण्यात येईल. त्याचप्रमाणे अमानत रकमेचा भरणा करतांना प्रमाणपत्र व आधार कार्डची झेरॉक्स प्रत सादर करावी लागेल. सदर लिलावाची बोली, ऑफर स्वीकारणे, न स्वीकारणे, लिलाव कायम करणे, पुढे ढकलने किंवा रद्द करणे तसेच ईतर कोणतेही कारण न देता सर्व अधिकार ठाणेदार पोलीस स्टेशन, घुग्घुस यांचे राहील, याची नोंद घ्यावी.असे घुग्घुस,पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बि.आर.पुसाटे यांनी कळविले आहे.