चामोर्शी – पत्रपेट्यांना अखेरची घरघर

41

✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-९४०४०७१८८३

चामोर्शी(दि.12फेब्रुवारी):-पूर्वी संवादाचे व सुख दुःख जाणून घेण्याचे एकमेव प्रभावी साधन हे – पोस्टकार्ड होते. पत्राद्वारे एकमेकांशी खाली खुशाली विचारली जायची. गात्र आता सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने हे पोस्टकार्ड दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे टपाल विभागांच्या पत्रपेट्यांना अखेरची घरघर लागल्याचे दिसून येत आहे. लहानपणी ‘ मामाचे पत्र हरवले, ते आम्हाला सापडले हा खेळ न खेळलेला माणूस विरळच.

परंतु आता येणाऱ्यां पत्रांमध्ये नेमके काय असते? हे समजनासे झाले आहे. त्या पत्रलेखनाची पद्धत माहीत नाही. पूर्वी संवादाचे सशक्त साधन असलेले पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र आता कुणीही वापरताना दिसत नाही. त्यामुळे नव्या पीढितील मुलांना त्याचा उपयोग काय व महत्त्व कळेनासे झाले आहे. हे पत्र टाकण्यासाठी टपाल विभागाने ठिकठिकाणी लावलेल्या लाल रंगाच्या टपालपेट्यांना आता अखेरची घटका मोजावी लागते आहे.