२९व्या झाडीबोली साहित्य संमेलनस्थळाला केंद्रीय समितीची सदिच्छा भेट

42

🔹बोलीच्या समृद्धीतुन मराठी भाषा अभिजात बनेल : डॉ. हरिश्चंद्र बोरकर

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12फेब्रुवारी):- १२ व १३ मार्च २०२२ ला जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर येथे २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आयोजित केले असून त्याच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर झाडीबोली साहित्य समितीच्या केंद्रीय समितीने संमेलनस्थळाला सदिच्छा भेट देऊन गावकऱ्यांशी हितगुज साधला .

भेट देणाऱ्या केंद्रीय समितीतील केंद्रीय अध्यक्ष डॉ. हरिश्चंद्र बोरकर सर , २८व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार निंबकर , २९व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे , लाखनीचे डॉ. चंद्रशेखर देवघरे , चंद्रपूर ग्रामीणचे अध्यक्ष अरुण झगडकर , चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर , मूल तालुकाध्यक्ष सुखदेव चौथाले , सौ. अर्चना चावरे ,कवी प्रशांत भंडारे ,कवी संतोष मेश्राम , कवी नागेंद्र नेवारे यांचे स्वागत २९ व्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष रंजित समर्थ , कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे , सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विनायक पा. बुग्गावार , झाडीपट्टीचे अभ्यासक किशोर उरकुंडवार , प्रतिकार बँकेचे उपाध्यक्ष माणिक पाटेवार , गणपत शेडमाके , महादेवजी सोयाम , प्रकाश कन्नाके , वैभव मडावी , रामभाऊ सिडाम , डॉ. विजय चिटमलवार , सुरेश कलगटवार , सुभाष पा. देशमुख , श्रेयश घोनमोडे , गौरव रामेवार , कल्पक बांबोळे , पंकज मद्रीवार , आशिष घोनमोडे , प्रज्वल गोवर्धन , सौ. शारदा पेशट्टीवार , डॉ. सुरेश पेशट्टीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन केले .

भेटीदरम्यान झाडीबोली शोधमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी नियोजनाची रूपरेषा मांडून ग्रामीण जनतेने मराठी टिकवल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला . जुनासुर्ला आणि पूर्व विदर्भ वैभवसंपन्न असून अधिक संशोधनाची गरज असल्याची भावना नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. मनोहर नरांजे यांनी व्यक्त केली . डॉ . संजय निंबकर यांनी मराठीला अभिजात दर्जा मिळायचा असेल तर बोली टिकली पाहिजे असे प्रांजळ मत व्यक्त केले. जुनासुर्ला येथील साहित्य संमेलन पूर्व विदर्भाचे वैभव उज्ज्वल करण्यास कारणीभूत ठरेल असे मत महिला जिल्हाध्यक्ष प्रा. रत्नमालाताई भोयर यांनी व्यक्त केले .

भेटीदरम्यान जुनासुर्ला गावातील सर्व परिसराचे अवलोकन करून तेथील परंपरेवर प्रकाश टाकण्यात आला . गावातील हेमाडपंथी मंदिर व भग्न मूर्त्याचे दर्शन घेण्यात आले . शक्तीमाता , बिरया , मयसमादेवी व माराई यांच्या मंदिराला भेट देण्यात आली . ढोली भरण्याची पद्धत आणि घोंगडे विणण्याची यंत्रे समितीला अद्भुत वाटली . या परिसर भेटीदरम्यान अनेक गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते . संमेलनाबद्दल गावकऱ्यांचा उत्साह आणि लोककला सादरीकरणाची तयारी बघून समितीने समाधान व्यक्त केले . या भेटीचे संचालन जुनासुर्ला शाखाध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे यांनी तर उपस्थितांचे आभार चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस रामकृष्ण चनकापुरे यांनी मानले .