प्रा.शिवराज बागंर एमपीडीए प्रकरणात सल्लागार मंडळ घेणार उद्या सुनावणी

33

✒️बीड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

बीड(दि.14फेब्रुवारी):-वंचित बहुजन आघाडीच्या ऊसतोड कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी बीड जिल्हाध्यक्ष समाजसेवक शिवराज बागंर यांच्यावर करण्यात आलेल्या एमपीडीए च्या कारवाईचा आढावा आता राज्यस्तरीय सल्लागार मंडळ घेणार असुन उधा सल्लागार मंडळाने ठेवली असुन त्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत तसेच शिवराज बागंर यांना देखील आपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बीडच्या जिल्हाधिकारयांनी काही दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते असलेले शिवराज बागंर यांच्यावर एमपीडीए कायद्याखाली कारवाई करून त्यांच्या स्थानबध्दतेचे आदेश दिले आहेत सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या एका कार्यकर्त्याविरूध्द झालेल्या या कारवाईचे मोठया प्रमाणावर सामाजिक पडसाद उमटले असुन अनेकांनी ही कारवाई योग्य नसल्याच्या भावना सोशल मिडीयातुन व्यक्त केल्या तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यानी आत्मदहनासारखा मार्ग पत्करावा लागेल असा ईशारा देखील जिल्हा प्रशासनाला दिला होता या पार्श्वभूमीवर आता राज्यस्तरीय सल्लागार मंडळासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयातील सल्लागार मंडळ याची सुनावणी घेणार असुन उधा होणारया सल्लागार मंडळाच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत