आष्टी च्या नगराध्यक्षपदी पल्लवी स्वप्नील धोंडे तर उपाध्यक्षपदी शैलेश पुरुषोत्तम सहस्रबुद्धे यांची अविरोध निवड

30

🔸आमदार सुरेश धस यांचे आष्टी नगरपंचायतवर दुसऱ्यांदा वर्चस्व

✒️आष्टी प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

आष्टी(दि.14फेब्रुवारी):-सर्व समाज घटकाला न्याय देऊन आमदार सुरेश धस यांनी राजकीय समतोल साधला. आष्टी च्या नगराध्यक्षपदी पल्लवी स्वप्नील धोंडे तर उपाध्यक्षपदी शैलेश पुरुषोत्तम सहस्रबुद्धे यांची अविरोध निवड तर आमदार सुरेश धस यांचे आष्टी नगरपंचायतवर दुसऱ्यांदा वर्चस्व.आष्टी नगरपंचायत मध्ये आज उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी पल्लवी स्वप्नील धोंडे तर उपनगराध्यक्ष पदासाठी शैलेश पुरुषोत्तम सहस्त्रबुद्धे या दोघांचे भारतीय जनता पार्टीच्या वतीने एकमेव अर्ज आल्याने त्यांना अविरोध घोषित करण्यात आले.

महाविकास आघाडीच्या वतीने कुठलाही अर्ज आला नाही. आष्टी नगरपंचायत मध्ये सर्व समाज घटकाला न्याय देऊन आण्णांनी आपला राजकीय समतोल राखला आहे.आष्टीच्या नगराध्यक्षपदी माळी समाजाच्या पल्लवी स्वप्नील धोंडे तर ब्राह्मण समाजाचे शैलेश सहस्त्रबुद्धे यांची निवड केली आहे. सुरेश धस यांचा राजकीय आलेख पाहता त्यांनी यापूर्वीही आष्टी नगरपंचायत मध्ये वडार समाजाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदाचा बहुमान दिलेला होता. तर आष्टी नगरपंचायतीच्या पहिला अध्यक्षपदाचा बहुमान हा मुस्लिम समाजाला देण्याचे त्यांनी काम केले. पल्लवी स्वप्नील धोंडे या माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांच्या सून असून रंगनाथ धोंडे हे आपल्या राजकीय प्रवासामध्ये आमदार सुरेश धस यांच्याशी संपूर्णपणे एकनिष्ठेने कार्यकर्ता म्हणून काम केलेले नेतृत्व आहे. शैलेश सहस्रबुद्धे युवक कार्यकर्ते म्हणून आमदार सुरेश धस यांचे समर्थक राहिले आहेत.

नुतन नगराध्यक्षा पल्लवी धोंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या की, माझ्यासारख्या युवतीला अण्णांनी एवढा मोठा पदाचा बहुमान दिल्याने आम्ही नक्कीच या पदाचा वापर करुन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करू तर शैलेश सहस्त्रबुद्धे म्हणाले की,माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आण्णानी उपाध्यक्षपदाचा बहुमान देऊन आम्हाला फार मोठा न्याय दिला आहे.

मात्र दिलेल्या पदाचा शहराच्या विकास कामासाठी अहोरात्र झटून उपयोग करू. यावेळी गटनेते किशोर झरेकर , माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे, माजी अध्यक्ष भारत मुरकुटे, माजी उपाध्यक्ष सुनिल रेडेकर, सुरेश वारंगुळे, नगरसेवक अक्षय धोंडे, जिया बेग, सय्यद शफी, श्याम वाल्हेकर, ईर्षांन खान, संतोष सुरवसे, संतोष मुरकुटे, मनोज सुरवसे, संतोष सुरवसे, नाजिम शेख, शंकर शिखरे, शमशुद्दीन शेख तसेच युवा नेते राधेश्याम धस, सचिन लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे, मधुकर सोळसे, कोल्हे मामा, सलिम कुरेशी, निखिल धोंडे, योगेश वांढरे, विजय देशमुख, निलेश होनकसे, अक्षय बोंदाडे, पत्रकार शरद रेडेकर, गणेश दळवी, प्रवीण पोकळे, रघुनाथ कर्डिले, अविनाश कदम, अक्षय विधाते, अविशांत कुमकर सह कार्यकर्ते उपस्थित होते.पल्लवी स्वप्नील धोंडे यांनी बीड जिल्ह्यामध्ये सर्वात कमी वयाचा नगराध्यक्षा म्हणून मान पटकावला आहे.