पाटोदा नगरपंचायतच्या अध्यक्षपदी सय्यद खतिजा तर उपाध्यक्ष बामदळे

36

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी,बीड)मो:-9075913114

बीड(दि.15फेब्रुवारी):-पाटोदा नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आलेली असून अध्यक्षपदासाठी सय्यद खतिजाबी अमर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आज त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून शरद बामदळे यांची वर्णी लागली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे आ. सुरेश धस यांच्यासह आदींनी अभिनंदन केले.नगरपंचायतीचे मतदान झाल्यानंतर आज अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला होता.

पाटोदा नगरपंचायतीमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालेले आहे. अध्यक्षपदासाठी आ. सुरेश धस यांचे समर्थक सय्यद खतिजाबी अमर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.आज त्यांची निवड बिनविरोधपणे घोषीत करण्यात आली. उपाध्यक्षपदी बामदळे शरद ज्ञानोबा यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून इंद्रजित गरड, भारती सागरे यांनी काम पाहिले. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी शहरामध्ये आनंदोत्सव साजरा केला.