सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ आणि गेवराई चे सुपुत्र मा. ॲड. श्री. दिलीप अण्णासाहेब तौर पाटील यांचा आज वाढदिवस अभिष्टचिंतन

162

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

गेवराई(दि.15फेब्रुवारी):- तालुक्यातील ढालेगाव सारख्या गोदाकाठचा गावात जन्मलेले ॲडव्होकेट दिलीपराव तौर यांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर दिल्लीमध्ये कामाचा ठसा उमटविला, बीड जिल्हा नव्हे तर मुंबई, पुणे, सातारा यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून त्यांच्याकडे लोक जातात, सर्वोच्च न्यायालयातील कामकाजासंदर्भात आपल्या भागातील वकील म्हणून त्यांनी विश्वासनीयता राखण्यात यश मिळविले आहे. सार्वजनिक प्रश्न विशेषतः जायकवाडीच्या पाण्याच्या प्रश्नांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास आहे. शेतकऱ्यांचे आणि विशेष करून मराठा समाजाचे प्रश्न सर्वोच्च न्यायालयात मांडताना आणि यासंदर्भात याचिकेतील सुनावणी करताना विनामोबदला त्यांनी काम केल्याचे अनेक उदाहरणे आहेत, अशा अनेक प्रसंगाचा मी स्वतः साक्षीदार आहे…!

ग्रामीण भागातून अनेक लोक मोठमोठ्या पदावर काम करताना मी पाहिलेत, परंतु उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या मातीची नाळ जपणारे लोक फार कमी असतात, ॲडव्होकेट दिलीपराव तौर पाटील यांनी मात्र आपल्या मातीचे इमान राखण्याचे काम सातत्याने केले आहे. त्यांच्या कामाचा आणि मोठेपणाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे …!!

माजी मंत्री मा.श्री. शिवाजीराव दादा पंडित यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री. अण्णासाहेब तौर पाटील यांचे ते चिरंजीव, श्री. अण्णासाहेब यांचा वारसा त्यांनी जपला आहे. माजी आमदार श्री. अमरसिंह पंडित व परिवाराचे वकील साहेबांशी पारिवारिक घनिष्ट संबंध आहेत. दिल्लीत आपलेपणा जपणारा माणूस म्हणून भैय्यासाहेबांचे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाहतात, तसे अनेकांना अनुभव सुद्धा आहेत.

साहेब, आपणास वाढदिवसाच्या मनापासून खूप- खूप शुभेच्छा …!!!