उदय अधिकारी यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘इंडिया एसएमई एक्सीलेंस अवॉर्ड-2021’अवॉर्ड ने सन्मानित

28

✒️मुंबई(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मुंबई(दि.15फेब्रुवारी):- राजभवन, मुंबई येथे ‘एसएमई चेंबर्स ऑफ इंडिया महाराष्ट्र इंडस्ट्रियल अँड एम्पॉवरिंग एसएमई फ़ॉर ग्लोबल कॉम्पीटीटीवनेस इकोनॉमिक डेवलोपमेन्ट एसोसिएशन’ तर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये अल-अजीज प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष उदय काशिनाथ अधिकारी यांना ‘एसएमई ऑफ द इयर – इनोव्हेशन अँड इन्व्हेन्शन्स’ श्रेणी अंतर्गत ‘इंडिया एसएमई एक्सीलेंस अवॉर्ड-2021’ अवॉर्डराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.ज्यामध्ये अल-अजीज प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष उदय अधिकारी आणि एमडी सागर अधिकारी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

हार्डवेअर उद्योगात नवीन क्रांती आणण्यासाठी 1988 मध्ये ‘अल-अजीझ प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड’ सुरू करण्यात आली. त्यांचे मुख्य उद्दिष्ट नेहमी नवीन तंत्रज्ञान शोधणे आणि नवनवीन संशोधन करणे. वीज, पाणी आणि वायू क्षेत्रात नेहमी नवनवीन शोध लावा, जेणेकरून पर्यावरण सुरक्षित राहते आणि तंत्रज्ञानात क्रांती होत राहते.कंपनीने देश-विदेशात वेगळी ओळख निर्माण केली आहे.