RTE ऑनलाइन प्रवेश फॉर्म सुरू 2022-2023

35

🔸वर्ग पहिली ते वर्ग आठवी पर्यंतचे मोफत शिक्षण…

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.16फेब्रुवारी):RTE ऑनलाइन फॉर्म
दि. 16 फेब्रुवारी 2022 भरता येणार असून याचा जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा. RTE चे शिक्षण हे सर्व पाल्याना वर्ग पहिली ते वर्ग आठवी पर्यंतचे मोफत शिक्षण आहे. कुठलेही शुल्क नाही SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.ओ. बी. सी. व खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे. R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश मिळेल.

R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत 25% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात येईल. प्रवेशाच्या वेळेस आवश्यक लागणारे कागदपत्रे खलील प्रमाणे असतील, रहिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे. आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणुक ओळखपत्र, वीज बील,घरपट्टी, Tax पावती, पाणीपट्टी,वाहन चालवण्याचा परवाना,पाल्याचा जन्माचा दाखला,पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो, पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST),व ओबीसी, ओपनसाठी एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला, हे सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे. RTE चा फार्म हा पालक स्वतः किंवा कोणत्याही ऑनलाईन नेट कॅफे मधुन भरू शकतो, व ऑनलाईन भरलेल्या फार्म ची प्रिंट काडून ती ऍडमिशन च्या वेळेस शाळा मध्ये आवश्यक कागदपत्रासह जमा करावी लागते. अश्या प्रकारे पालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात RTE शिक्षणाचा लाभ आपल्या पाल्यांना द्यावा.