मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह

29

🔸श्रीमद् संगीत भागवत ; श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

 

श्री. समर्थ नागोजी महाराज यांच्या १०४ व्या पुण्यतिथीनिमित्त पुसद तालुक्यातील मांडवा येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् संगीत भागवत सप्ताहाचे आयोजन १७ ते २४ फेब्रुवारीपर्यंत श्री. समर्थ नागोजी महाराज देवस्थान परिसरात करण्यात आले.

भागवताचार्य संतोष महाराज ठाकरे(रा.आसरा पार्डी जि.वाशिम)यांच्या रसाळ वाणीतून प्रबोधन होईल. गुरूवारी (ता.१७) ह.भ.प.खंडु महाराज सांडवेकर, ह.भ.प.रंगनाथ मुरूंबेकर,(ता.१८)ह.भ.प.छोटू महाराज आळंदी,(ता.१९)ह.भ.प.प्रदिप महाराज कतारे धानेगाव पिंपरी,(ता.२०)ह.भ.प.मनमोहन महाराज गिरी(भागवताचार्य) आळंदी,(ता.२१)ह.भ.प.वैजनाथ महाराज प्रतिढोक(रामायणाचार्य)हिगोंली,(ता.२२)ह.भ.प.मंगेश महाराज शहाकार नांदेड, श्री. समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवाच्या सौजन्याने (ता.२३)अनिल महाराज तुपे कीर्तन राहील.२४)ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे मलकापूर, गुरुवारी १ वाजता ह.भ.प.शिवाजी महाराज ठाकरे यांचे काल्याचे किर्तन होईल.

भागवत कथेतील संच अंभोरे महाराज (आसोली),अशोक महाराज (कान्हा),अजिंक्य महाराज मांडवेकर(तबलावादक) व श्री.समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ(मांडवा), किर्तनातील गायनाचार्य उत्तमराव गाढवे (बोरी),वैजनाथ महाराज (चिकणी)बबनराव पारध (काकडदाती),खंडुजी महाराज (सांडवकर),सुनील महाराज (बोथा),गोपाल महाराज (बोथा), मृदुंगाचार्य विदर्भरत्न मृदुंगाचार्य अजिंक्य महाराज मांडवेकर, सप्ताहातील विनेकर निळकंठ धाड, भगवान आबाळे ,प्रभु चिरमाडे, प्रकाश पुलाते, नथ्थु राठोड ,किसन माटे, वासुदेव पुलाते, बापुराव कोरडे, समाधान आबाळे,उत्तम पुलाते,गजानन साखरे,पंकज आबाळे,नामदेव मंदाडे,चेतन पुलाते,गजानन आबाळे, काकड नेतृत्व श्री. समर्थ नागोजी महाराज भजनी मंडळ,किर्तनातील विनेकर बापुराव आबाळे,चोपदार माणिकराव फुके वनवार्ला,सप्ताहातील भजनी मंडळ सांडवा ,बोरी (खु),काकडदाती, बोरी,बोरगडी,कारला देव,धनसळ.मनसळ,वनवार्ला,हेगडी,मोहदरी,शेलु,टेबुरदरा,दहीवड,बोथा,येहेगाव (गवळी),माणिकडोह,चिलगव्हाण,जवळी,बोरनगर, आसोली,देवगव्हाण,शेंबाळपिपरी, खडकदरी, लोणदरी इत्यादी गावांची भजनी मंडळी उपस्थित राहतील.

(ता.२३) सायंकाळी श्री .समर्थ नागोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री .समर्थ नागोजी महाराज ऑटो संघटना मांडवा या संघटनेमार्फत पुसद ते मांडवा मोफत सेवा राहील.

यंदा यात्रा भरणार नाही व या कार्यक्रमाचा आणि महाप्रसादाचा कोरोणाच्या नियमाचे पालन करून भाविकांनी लाभ घ्यावा असे आयोजक मंडळीने आवाहन केले आहे.